नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार पटेल यांना योग्य सन्मान मिळाला नाही – अमित शाह

जेवढा सन्मान नेताजी आणि सरदार पटेल यांना इतिहासात मिळायला हवा होता, तेवढा त्यांना मिळाला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

amit shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (फोटो सौजन्य – पीटीआय)

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नाही, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसवर टीका केली. अंदमान आणि निकोबार बेटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर एका जनसभेला संबोधित करताना शाह म्हणाले, “जेवढा सन्मान नेताजी आणि सरदार पटेल यांना इतिहासात मिळायला हवा होता, तेवढा त्यांना मिळाला नाही.”

 “पंतप्रधान मोदी यांनीच दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला आणि अंदमानमध्ये ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर प्रथमच ज्या ठिकाणी ध्वज फडकवला होता, त्या ठिकाणी ‘फ्लॅग पॉइंट’चे उद्घाटन केले. आम्ही स्वातंत्र्य संग्रामादरम्यान सरदार पटेल यांच्या योगदानाचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी केवडियामध्ये जगातील सर्वात उंच पुतळा उभारला. मजबूत भारत बनवण्यामागील त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरू शकत नाही,” असेही अमित शाह म्हणाले.

“भविष्यात, अंदमान आणि निकोबार बेटांना देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवण्याची आमची योजना आहे. आम्ही नेताजींची जयंती परक्रम दिवस म्हणून साजरी करायला सुरुवात केली आहे आणि लवकरच आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये नेताजींचे भव्य स्मारक उभारू. मी या देशातील सर्व युवकांना विनंती करू इच्छितो की, एकदा आमच्या अंदमानला भेट देऊन आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाला समजून घ्या,” असं आवाहन अमित शाह यांनी तरुणांना केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Netaji subhash chandra bose and sardar patel did not get enough respect says amit shah hrc

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या