अझिझपूर जाळपोळ प्रकरण कट: नितीशकुमारांचा आरोप , पाटणा

अझिझपूरमध्ये अलीकडेच झालेल्या जाळपोळीच्या प्रकारांमागे कट असल्याचा दावा जद(यू)चे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी केला असून त्याला माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी आव्हान दिले आहे.

अझिझपूरमध्ये अलीकडेच झालेल्या जाळपोळीच्या प्रकारांमागे कट असल्याचा दावा जद(यू)चे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी केला असून त्याला माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी आव्हान दिले आहे. या घटनेमागे कोण आहे त्यांचे बिंग नितीशकुमार यांनी फोडावे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
प्रत्येक गोष्टीत नितीशकुमार यांना कट असल्याचा वास येण्याची सवयच आहे. जर अझिझपूर जाळपोळीमागे कट असेल तर राज्य सरकारने त्यांचे बिंग फोडलेच पाहिजे, असे मोदी यांनी वार्ताहरांना सांगितले.या जाळपोळीमागे भाजपचा हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप नितीशकुमार यांनी केला त्याबाबत मोदी म्हणाले की, दोषारोपांचे खापर फोडत बसण्यापेक्षा राज्य सरकारने याची चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nitish conspiracy charge in azizpur arson

ताज्या बातम्या