केंद्र सरकारने स्वातंत्र्य सैनिक आणि हिंदुत्ववादी नेते विनायक दामोदर सावरकर यांच्याशी संबंधित संग्रहायलयांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी याबाबत लोकसभेत लेखी माहिती दिली आहे. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता की, आपल्या देशात वीर सावरकर आणि देशातल्या इतर स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित संग्रहालयांची संख्या खूप कमी आहे, अथवा असे संग्राहलय आपल्या देशात नाहीत, ही बाब खरी आहे का? या प्रश्नानंतर जी. किशन रेड्डी यांनी स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित संग्रहालयांची माहिती संसदेत सादर केली.

लेखी उत्तरात जी. किशन रेड्डी यांनी संसदेत एक यादी उपलब्ध करून दिली. यानुसार देशात अशी अनेक संग्रहालये आहेत जिथे स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रीय चळवळ आणि राष्ट्रवादी नेत्यांशी संबंधित माहिती मिळते. परंतु यापैकी एकही संग्रहायल सावरकांशी संबंधित नाही. मंत्री रेड्डी यांनी देशातल्या १५ संग्रहालयांची माहिती जारी केली आहे.

संसदेत जाहीर करण्यात आलेली संग्रहालयांची यादी

केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित संग्रहालयांची यादी जाहीर केली. यामध्ये १५ संग्रहालयांचा समावेश करण्यात आला आहे. यात दिल्लीतल्या लाल किल्ल्यात असलेलं संग्रहालय ‘१८५७ – भारताचा पहिला सातंत्र्य संग्राम’, लाल किल्ल्यातलं ‘याद-ए-जलियां’, लाल किल्ल्यातलं ‘नेताजी सुभाष चंद्र बोस – भारतीय राष्ट्रीय सेना’, ‘आझादी के दिवाने’ या संग्रहालयांचा समावेश आहे. तसेच गुजरातच्या आणंद येथील ‘सरदार वल्लभ भाई पटेल’ आणि ‘वीर विट्ठल भाई पटेल मेमोरियल म्युझियम’चा समावेश आहे.

हे ही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या राजस्थान दौऱ्यापूर्वी पोलिसांनी पकडली १,००० किलो स्फोटकं, एक अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय इतर राज्यांमधील संग्रहालयांची यादी देखील जारी करण्यात आली आहे. यामध्ये झारखंडच्या रांचीतलं ‘बिरसा मुंडा संग्रहालय’, मध्य प्रदेशातल्या मोरेनामधील ‘शहीद पंडित रामप्रसाद बिस्मिल संग्रहालय’, महाराष्ट्रातल्या पुणे येथील ‘आगा खान पॅलेसमधील महात्मा गांधी संग्रहालय’, मणिपूरमधील इम्फाळ येथील ‘आयएनए म्य़ुझियम’, ओदिशाच्या कटकमधील ‘नेताजी जन्मस्थळ संग्रहालय’, तामिळनाडूच्या चेन्नई येथील ‘फोर्ट सेंट जॉर्ज संग्रहालय’, उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील ‘१८५७ रेसिडेन्सी म्युझियम’, ‘पंडित जीबी पंत लोककला संग्रहालय’, उत्तर प्रदेशमधल्या शाहजहांपूर येथील ‘कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय’ आणि कोलकाता येथील ‘नेताजी रिसर्च ब्युरो, स्वातंत्र्य सैनिक संग्रहालया’चा समावेश आहे.