पाटलीपुत्र मतदारसंघात पुन्हा एकदा रामकृपाल यादव व मिसा भारती यांच्यात लढत होत आहे. फेररचनेत पाटणा मतदारसंघातून पाटलीपुत्र या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी रामकृपाल यादव यांनी लालूंची साथ सोडून गेल्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करत पाटलीपुत्र मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी लालूंच्या कन्या मिसा भारती यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला होता. यंदा पुन्हा मिसा भारती यांनी आव्हान उभे केले आहे. गेल्या वेळी या मतदारसंघात भाकप (माले) च्या उमेदवाराला ५१ हजार मते मिळाली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दलाला पाठिंबा दिला आहे. तर नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल भाजपबरोबर असल्याने त्यांच्या उमेदवाराला मिळालेली ९१ हजार मते पारडय़ात पडतील अशी भाजपला अपेक्षा आहे. पाटण्यातून लालूप्रसाद यादव या पूर्वी पराभूत झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाच्या दृष्टीने ही महत्त्वाची लढाई आहे. रामकृपाल केंद्रात मंत्री आहेत. पाटलीपुत्र मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन ठिकाणी राजद व एका ठिकाणी काँग्रेस तर भाजपचे दोन आमदार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2019 रोजी प्रकाशित
लक्षवेधी लढत : पाटलीपुत्र
पाटलीपुत्र मतदारसंघात पुन्हा एकदा रामकृपाल यादव व मिसा भारती यांच्यात लढत होत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-05-2019 at 00:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notable fight patna constituency