Premium

Odisha train accident : “कुणाचा हात कापला गेला तर कुणाचा पाय….” कोरोमंडल एक्स्प्रेसच्या प्रवाशाने सांगितली आपबीती

ज्या प्रवाशाने काय घडलं ते सांगितलं तो कोरोमंडल एक्स्प्रेसनेच प्रवास करत होता

Odisha Train Accident Survival
ओडिशामध्ये भीषण अपघात आणि मृत्यूचं तांडव (फोटो-इंडियन एक्स्रपेस)

ओडिशाच्या बालासोर या ठिकाणी झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेविषयी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. हा अपघात इतका भीषण होता की मदत आणि बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला गॅस कटरच्या मदतीने मृतदेह काढावे लागत आहेत. हा अपघात पाहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने त्याने पाहिलेली परिस्थिती सांगितली आहे जी अंगावर काटा आणणारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे प्रत्यक्षदर्शीने?

“रात्र बरीच झाली होती त्यामुळे माझ्यासह जवळपास सगळेच प्रवासी झोपले होते. त्याचवेळी गाडी घसरली. मोठा आवाज झाला आणि मी झोपेतून एकदम जागा झालो. मी पाहिलं माझ्या अंगावर १०, १५ माणसं पडली होती. मी दबला गेलो होतो. मी कसबसा त्यातून बाहेर पडलो. किती लोकांचा मृत्यू झाला ते मला माहित नाही. पण मी जेव्हा बोगीतून बाहेर पडलो तेव्हा पाहिलं कुणाचा हात नव्हता, कुणाचा पाय कापला गेला होता. लोक किंचाळत होते, ओरडत होते, मदत मागत होते. माझ्या हाताला आणि मानेला जखम झाली आहे. पोलीस आणि इतर टीम त्या ठिकाणी आल्या त्यांनी लोकांना वाचवण्यास सुरुवात केली.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. “ओडिशा ट्रेन अपघात वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जे अपघातात जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळावा म्हणून मी प्रार्थना करतो. तसंच अपघात झालेल्यांना लवकरात लवकर सगळी मदत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत.” या आशयाचं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

शुक्रवारी रात्रीपासूनच मदत आणि बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक सगळं रात्रभर त्या परिसरात होतं. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 09:04 IST
Next Story
Train Tragedy : ओडिशातील नागरिकांच्या माणुसकीला सलाम, आवाहन करताच रुग्णालयांमध्ये रक्तदानासाठी रांगा