पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सर्वाधिकार एकवटलेले असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सपशेल फेटाळून लावला आहे. मोदी सर्वाचे म्हणणे ऐकून घेतात, मात्र त्यांचा शब्द अंतिम आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले आहे.
यूपीएच्या राजवटीत डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे प्रत्यक्षात कोणतेही अधिकार नव्हते. लोकशाहीत पंतप्रधानांचा शब्द अंतिम असतो, त्यामध्ये अनुचित काहीही नाही, नरेंद्र मोदी हे शक्तिशाली नेते आहेत, मात्र ते सर्वाचे म्हणणे ऐकतात, वाजपेयींचे सरकार असतानाही प्रत्येकाशी सल्लामसलत केली जात होती,असेही अर्थमंत्री म्हणाले. एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेटली यांनी पुढे म्हटले आहे की, मोदी आणि डॉ. सिंग यांची तुलना होऊ शकत नाही.