२०१४, २०१९ आणि आता २०१४ च्या लोकसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अवतीभवती फिरताना पाहायला मिळाल्या आहेत. आजही भारतीय जनता पक्षामध्ये सर्वच उमेदवार नरेंद्र मोदींचं नाव घेऊनच लोकांकडून मतं मागताना दिसत आहेत. “मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे”, असं म्हणत हे उमेदवार प्रचारसभांमधून भाषणं करताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी नरेंद्र मोदींना मात्र कधीच निवडणूक लढवायची नव्हती, असा खुलासा समोर आला आहे. खुद्द मोदींनीच यासंदर्भात सविस्तर भाष्य केलं आहे. त्यामुळे मोदींचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूमधील थंती वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात भाष्य केलं आहे. मोदींना तामिळनाडूमधून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असता त्या प्रश्नावर त्यांनी ‘कधी निवडणूक लढवायचीच नव्हती, पक्ष सांगेल तिथे मी जातो’, असं उत्तर दिलं.

“मी आयुष्यात कधी निवडणूक लढवेन असा विचारच केला नव्हता. मला तर अचानक या मार्गाने यावं लागलं आहे. मी वेगळ्याच कामासाठी स्वत:ला समर्पित केलं होतं. मी कधीच स्वत:साठी विचार केला नाही. मला निवडणूक लढवायची आहे असा विचार मी कधीही केला नाही. मी कधी तसा निर्णयही घेतला नाही. मी पक्षाचा एक शिस्तप्रिय कार्यकर्ता आहे. पक्षानंच माझ्यासाठी निर्णय घेतला”, असं मोदी या मुलाखतीत म्हणाले.

“मी पहिली विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णयही पक्षानंच घेतला होता. आधी सांगितलं राजकोटवरून निवडणूक लढवा, तिथून निवडणूक लढवली. मग सांगितलं बडोद्याहून लढा, काशीहून लढा. पक्ष जिथे पाठवेल, तिथे मी जात असतो. मी या बाबतीत कुठे डोकं लावत नाही”, असं ते म्हणाले.

“खुल्या मनाने मी मुलाखतीसाठी जातो”

दरम्यान, आपण कोणत्याही ठिकाणी खुल्या मनाने जात असतो, असं विधान मोदींनी यावेळी केलं. “माझ्या यात्रेचं मूळ कारण हे आहे की मी मनात काही गोष्टी ठेवून कोणतं काम करतच नाही. मी या मुलाखतीसाठीही खुल्या मनानेच आलो आहे. खुल्या मनानेच जीवनाच्या विकासाचे दरवाजे उघडतात”, असं मोदी म्हणाले.

‘सेन्गोल’ प्रकरणावरून विरोधकांवर टीका

दरम्यान, संसदेच्या नव्या सभागृहात ‘सेन्गोल’ची स्थापना करण्याला विरोधी पक्षांनी, त्यातही तमिळनाडूतील पक्षांनी विरोध केला होता. यासंदर्भात भाष्य करताना मोदींनी टीका केली. “देशाचं दुर्दैवं आहे की तेव्हा तमिळनाडूचे नेते स्वत: याचा बहिष्कार करत होते. यापेक्षा मोठं दुर्दैवं काय असू शकेल? जर तमिळनाडूचं नेतृत्व, तमिळनाडूची संस्कृती यावर गर्व करणार नाही, तर किती नुकसान होईल याचा त्यांना अंदाज नाहीये”, असं ते म्हणाले.

“चिप उत्पादकांना अनुदान देण्यापेक्षा…”, रघुराम राजन यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “इथे रोजगार मोठं आव्हान असताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“यातून राजकीय फायदा होणार असता, तर हे लोक तर माझ्यापेक्षा दहापट जास्त कमावून बसले असते. त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त ताकद आहे. त्यांना माहिती आहे की यामुळे देश मजबूत झाला असता, मतांचं राजकारण संपलं असतं. त्यामुळे ते घाबरत आहेत. जर यातून मतं मिळाली असती, तर ते माझ्यापेक्षा आधी त्यासाठी धावपळ करताना दिसले असते”, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.