scorecardresearch

Premium

“…तर मला इतके कष्ट घ्यावे लागले नसते”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, छत्तीसगडच्या पवित्र भूमीवर आपल्या देशाविरोधात कट रचला जात आहे.

Narendra Modi
रायपूरमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. (PC : Narendra Modi Twitter)

पंतप्रधान मोदी आज (१४ सप्टेंबर) मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. दुपारी त्यांनी मध्यप्रदेशमध्ये अनेक विकासकामांचं लोकार्पण केलं. तसेच सागर जिल्ह्यातील बीना रिफायनरीची पायाभरणी केली. त्यापाठोपाठ सायंकाळी छत्तीसगडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच छत्तीसगडमधील भूपेश बघेल यांच्या सरकारवरही टीका केली. पंतप्रधान म्हणाले, काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून छत्तीसगडमधील खनिज संपत्तीचा एटीएमप्रमाणे वापर करत आहेत. खोटा प्रचार आणि अखंड भ्रष्टाचार हे छत्तीसगड काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “छत्तीसगडची भूमी म्हणजे प्रभू श्रीरामाचं आजोळ आहे. कौशल्या मातेचं येथे मोठं मंदिर आहे. परंतु, या पवित्र भूमीवर आपल्या देशाविरोधात कट रचला जात आहे. त्यामुळे मी तुम्हाला जागरूक करायला आलो आहे.” विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीबद्दल नरेंद्र मोदी म्हणाले, या लोकांनी मिळून एक इंडिया आघाडी तयार केली आहे. परंतु, काही लोक या आघाडीला घमंडिया आघाडी म्हणत आहेत. या इंडिया आघाडीला आपल्या देशाची सनातन संस्कृती नष्ट करायची आहे.

Priyanka Gandhi on Rahul Gandhi Ravan Poster
Rahul Gandhi Ravan Poster: राहुल गांधींचे ‘रावणा’च्या रूपात पोस्टर दाखवल्यावर प्रियांका गांधी आक्रमक; म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि…”
Talasani-Srinivas-Yadav-and-PM-modi
Telangana : मुख्यमंत्री केसीआर पंतप्रधानांचे स्वागत कधीच करत नाहीत; हिंदी बोलणाऱ्या मंत्र्याची केली नियुक्ती
PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडलं महिला आरक्षण विधेयक; म्हणाले, “ईश्वराने मला…”
bollywood actress kangana ranaut warm wishes to pm narendra modi
कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; श्रीरामाशी तुलना करत म्हणाली…

काँग्रेसवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले, ६० वर्ष देशात काँग्रेसचं सरकार होतं. याच काळात काही वर्षांपूर्वी काँग्रेसने देशातून गरिबी हटवण्याची घोषणा केली होती. त्यांनी देशातून गरिबी हटवण्याची गॅरंटी दिली होती. अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून हे लोक गरिबी हटवण्याच्या गप्पा मारतायत की नाही? तेव्हापासून काँग्रेस हीच घोषणा देत आहे आणि प्रत्येक निवडणूक लढत आहे. काँग्रेस प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारावेळी गरिबी हटवण्याच्या घोषणा करत आली आहे. काँग्रेस आजही गरिबी हटवण्याच्या गॅरंटीवर निवडणूक लढत आहे.

हे ही वाचा >> “खरे प्रतोद कोण? हा कळीचा मुद्दा ठरला तर…”, आमदार अपात्रतेसंदर्भात आमदार भरत गोगावले स्पष्टच बोलले

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जर काँग्रेसने त्यांचं सरकार असताना आपलं काम नीट केलं असतं तर आज मोदीला इतकी मेहनत करावी लागली नसती. मोदीनेही देशातल्या गोरगरिबांना सशक्त करण्याची गॅरंटी दिली होती. आज तुम्ही त्याचे परिणाम पाहत आहात. केवळ पाच वर्षांमध्ये आपल्या देशातील १३.५ कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi says if congress had done their work then i wouldnt have to work so hard asc

First published on: 14-09-2023 at 21:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×