विविध सरकारी योजनांत आपल्या कष्टाचे पैसे गुंतवून निवृत्तीनंतरच्या सुखकर जीवनाची स्वप्ने बघणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. छोट्या गुंतवणूकदारांच्या हक्काच्या योजना असलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्रे (एनएससी), किसान विकास पत्र, आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारख्या योजनांच्या व्याजदरात कपात करून धक्का दिला आहे. एकीकडे व्याजदरात कपात व दुसरीकडे जीएसटीच्या माध्यमातून कर वाढवल्यामुळे लोकांना दुहेरी आर्थिक फटका बसणार असल्यामुळे देशभरातून नाराजीचा सूर उमटत आहे. पीपीएफचा व्याजदर ७.८ टक्के, ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीसाठी ८.३ टक्के, किसान विकास पत्र ८.५ टक्के आणि एनएससी ७.८ टक्क्यांपर्यंत व्याज कमी करण्यात आले आहे.