नवी दिल्ली : ‘‘गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनातील प्रवेश हा नव्या भविष्याचा श्रीगणेशा आहे. स्वातंत्र्याच्या शतकोत्सवामध्ये म्हणजे २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र झालेला असेल’’, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या अखेरच्या कार्यक्रमात व्यक्त केला.

जुन्या संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातील औपचारिक कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर संसदेच्या नव्या इमारतीमध्ये विशेष अधिवेशनाची रितसर सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संसदेच्या दोन्ही सदनांतील खासदारांनी नव्या संसद भवनामध्ये मंगळवारी प्रवेश केला. नव्या इमारतीतील प्रवेशसोहळय़ापूर्वी मंगळवारी जुन्या संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहाच्या बाहेर दोन्ही सदनांमधील सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढले गेले.नवी इमारत नव्या प्रतिकांची सुरुवात असून, देशातील १४० कोटी नागरिकांच्या आशा व आकांक्षांतून नवी ऊर्जा व नवा आत्मविश्वास निर्माण होईल. सामाजिक न्याय व न्याय विकासाला केंद्र सरकारचे प्राधान्य दिले जाईल, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>“..तर सोनिया आणि राहुल गांधींना राम मंदिरात घेऊन या”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचं ‘या’ दोन नेत्यांना ओपन चॅलेंज

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. नेहरूंच्या संसद भवनातून मध्यरात्री केलेल्या पहिल्या भाषणाचा (ए ट्रिस्ट विथ डेस्टिनी..) मोदींनी आवर्जुन उल्लेख केल्याबद्दल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधानांचे आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुने संसद भवन आता संविधान सदन

जुने संसद भवन आता संविधान सदन म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा मोदींनी केली. जुन्या संसद भवनाची प्रतिष्ठा कुठेही कमी होऊ नये. या संसद भवनाला आपण केवळ जुनी इमारत असे म्हणणे योग्य ठरणार नाही. म्हणून या संसद भवनाचे संविधान सदन असे नामकरण करू, असे मोदी म्हणाले.