अमेरिकेपाठोपाठ आता युरोपमध्ये भारतीय नागरिकावर वर्णद्वेषावरून टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेसंबधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. वाढत्या वर्णद्वेषांच्या घटनांमुळे भारतीयांमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.

पोलंडमध्ये भारतीय व्यक्तीला वर्णद्वेषावरून टिप्पणी

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये स्वतःला अमेरिकेचा नागरिक म्हणवणारा व्यक्ती भारतीय व्यक्तीला पैरासाइट (परजीवी) आणि जेनोसाइडर (नरसंहार करणारा ) असं संबोधताना दिसून येत आहे. पोलंडमधील या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या भारतीय नागरिकाची ओळख अद्याप पटलेली नसून, व्हिडिओमध्ये भारतीय व्यक्ती संबंधित व्यक्तीला विरोध करताना दिसत आहे. तसेच तू हा व्हिडिओ का बनवत आहे? असा प्रश्न भारतीय नागरिक या व्यक्तीला विचारताना ऐकू येत आहे. दरम्यान या दोन व्यक्तीमध्ये नेमका वाद कोणत्या कारणामुळे झाला याचं नेमकं कारण समोर आलेले नाही. तसेच या प्ररकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

हेही वाचा- VIDEO: अशोक गेहलोत यांना बघताच भक्तांनी लगावले ‘मोदी-मोदी’चे नारे, “गेहलोत यांनी हात उंचावत…”

तुम्ही पोलंडमध्ये का आहात? अमेरिकन नागरिकाचा भारतीयाला प्रश्न

तसेच तुम्ही आमच्या जातीचा नरसंहार करत आहात, तुम्ही पोलंडमध्ये का आहात? असा प्रश्न व्हिडीओ बनवणारा अमेरिकन नागरिक विचारताना दिसत आहे. तसेच तुम्ही आमच्या पोलंडवर आक्रमण करू शकता असे तुम्हाला वाटते का? तुमचा स्वतःचा देश आहे, तुम्ही तिथे का जात नाही? असा सवाल करताना दिसत आहे. पोलंड फक्त पोलिश नागरिकांसाठी असून तुम्ही पोलिश नसल्याचे म्हणत आहे.

हेही वाचा- UK PM Election: ब्रिटिशांना मिळणार भारतीय वंशाचा पंतप्रधान? कोण होणार PM? ऋषी सुनक की लिज ट्रस? ४८ तासांवर निकाल

अमेरिकेतही भारतीय महिलांना शिविगाळ

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतही भारतीय महिलेला शिविगाळ केल्याची घटना घडली होती. “मी भारतीयांचा तिरस्कार करते, तुम्ही परत भारतात जा,” असं म्हणत एका अमेरिकेन महिलेने भारतीय महिलांना शिविगाळ केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल झाला होता. त्यानंतर टेक्सास पोलिसांनी आरोपी महिलेवर कारवाई केली होती.