काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबद्दल केलेल्या विधानावरून त्यांच्यांविरोधात बदनामीचा खटला सुरु आहे. आज ( ७ जुलै ) गुजरात उच्च न्यायालय या खटल्याचा निकाल देणार आहे. त्यामुळे राहुल गांधींना दिलासा मिळतो की शिक्षा कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ‘मोदी आडनावाचे सर्व चोर आहेत’ असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. याप्रकरणी भाजपा नेते पूर्वेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या सर्व लोकांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा :मोदी सरकारकडून पराभवाचा सूड! तांदूळ पुरवठय़ावरून काँग्रेसची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने २३ मार्च २०२३ ला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २४ मार्चला लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना अपात्र ठरवलं होतं. सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध राहुल गांधींनी २५ एप्रिलला गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.