पुरुषांच्या वासनायुक्त नजरा टाळण्यासाठी मुलींच्या परकररूपी गणवेशावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी राज्य विधिमंडळातील एका आमदाराने केली आहे.अल्वर (शहर) मतदारसंघाचे आमदार बनवारीलाल सिंघल असे या आमदाराचे नाव असून त्यांनी यासंबंधात राज्याचे मुख्य सचिव सी. के. मॅथ्यू यांना एक पत्र धाडले आहे. या पत्रात गणवेश म्हणून परकार-पोलक्याऐवजी पॅण्ट अथवा सलवार-कमीज असा बदल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुरुषांकडून मुलींवर टाकण्यात येणारे वासनायुक्त कटाक्ष टाळण्यासाठी त्याचप्रमाणे कुठल्याही मोसमात मुलींना सोयीचा पडावा, म्हणून या गणवेशात बदल करण्यात यावा, अशी आपण मागणी केली असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.