पीटीआय, नवी दिल्ली
सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’ या तैलचित्राला ‘सॅफ्रॉनआर्ट’च्या लिलावामध्ये ६१.८ कोटी रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. शेरगिल यांनी १९३७ साली रेखाटलेल्या या चित्राला मिळालेली ही किंमत कोणत्याही भारतीय कलाकाराच्या कलाकृतीला जगभरात मिळालेली सर्वोच्च किंमत आहे.
यापूर्वी सय्यद हैदर रझा यांच्या १९८९च्या ‘गेस्टेशन’ या चित्राला गेल्याच महिन्यात पुंडोलेंच्या लिलावात ५१.७५ कोटी रुपये किंमत मिळाली होती. सॅफ्रॉनआर्ट येथे शनिवारी झालेल्या लिलावामध्ये एम एफ हुसैन, वासुदेव गायतोंडे, जामिनी रॉय आणि एफ एस सौझा यासारख्या ७० नामवंत कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश होता.
हेही वाचा >>>ditya L1 आणि ISRO चं चॅटिंग सुरु; पृथ्वीपासून ५०,००० किमी दुरून पाठवतोय डेटा, ज्यामुळे..
अमृता शेरगिल यांचे ‘द स्टोरी टेलर’ हे चित्र एक मैलाचा दगड आहे. त्यातून त्यांचे कौशल्य आणि अमर वारशाची साक्ष मिळते अशी प्रतिक्रिया ‘सॅफ्रॉनआर्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश वझिरानी यांनी व्यक्त केली.अमृता शेरगिल यांची आवडती कलाकृती खुद्द अमृता शेरगिल यांनी ‘द स्टोरी टेलर’ ही आपल्या सर्वोत्तम १२ कलाकृतींपैकी असल्याचे सांगितले होते. हे चित्र त्यांच्या सर्वात प्रामाणिक आणि अभिव्यक्तीपूर्ण रचनांपैकी एक मानले जाते. हे चित्र सर्वात प्रथम नोव्हेंबर १९३७ मध्ये लाहोरच्या फालेती हॉटेल येथे झालेल्या अमृत शेरगिल यांच्या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.