नवी दिल्ली : करोनाच्या कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर ८ ते १६ आठवडय़ांच्या दरम्यान देण्याची शिफारस लसीकरण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (‘एनटीएजीआय’ने) केली आहे. सध्या कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर १२ ते १६ आठवडय़ांदरम्यान देण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लसीकरणाबाबतची देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘एनटीएजीआय’ने केलेली ‘कोव्हिशिल्ड’बाबतची ही शिफारस अद्याप लागू करण्यात आलेली नाही. परंतु, अनेक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्याबाबत निर्णय घेतल्यास देशातील सहा ते सात कोटी लोकांना कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा वेगाने देता येईल.

कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रांमधील कालावधी कमी करण्याबाबतची ‘एनटीएजीआय’ची नवी शिफारस अलीकडील जागतिक शास्त्रीय पुराव्यांवर आधारित आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा आठ आठवडय़ांनी दिली काय किंवा १२ ते १६ आठवडय़ांच्या अंतराने दिली काय, निर्माण होणारी प्रतििपडे (अँटिबॉडीज रिस्पॉन्स) जवळजवळ समान असतात, असे या अभ्यासातील निष्कर्ष आहेत.

‘एनटीएजीआय’च्या शिफारशींच्या आधारे सरकारने १३ मे २०२१ रोजी कोव्हिशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर ६ ते ८ आठवडय़ांवरून १२ ते १६ आठवडय़ांपर्यंत वाढवले होते.

कोव्हॅक्सिनबाबत बदल नाही

लसीकरण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (‘एनटीएजीआय’ने) अद्याप भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या मात्रा घेण्याबाबत कोणताही बदल सुचवलेला नाही. या लशीची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर २८ दिवसांनी दिली जाते.

राज्यात ११३ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात रविवारी करोनाचे ११३ रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला़  मुंबई शहरात रविवारी करोनाचे २७ रुग्ण आढळल़े  शहरात दिवसभरात ४४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या २९८ झाली आह़े

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second covishield dose can be taken between 8 16 weeks after first dose zws
First published on: 21-03-2022 at 02:17 IST