बंगळुरूमधील एका कंपनीत वरिष्ठांनी राजीनामा द्यायला सांगितल्याने एका कर्मचाऱ्याने थेट कंपनीत बाँब ठेवल्याची अफवा पसरवल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी ५०० कर्मचाऱ्यांना इमारतीतून बाहेर काढत तपासणी केली. तपासणीनंतर बाँब ठेवल्याची अफवा असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली.

बंगळुरूमध्ये आरएमझेड परिसरातील अकाऊंटींग कंपनीत काम करणाऱ्या आरोपी कर्मचाऱ्याचं नाव प्रसाद नवनीथ (२५) असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसादला कंपनीने खराब कामगिरीचं कारण देत राजीनामा देण्यास सांगितलं. यानंतर प्रसादने कंपनीच्या लँडलाईनवर कॉल करून वरिष्ठांशी बोलण्याची विनंती केली. त्याची ही विनंती अमान्य केल्यानंतर त्याने त्याच्या मोबाईलवरून ७-८ वेळा कॉल केला. मात्र, कंपनीच्या वरिष्ठांनी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. यानंतर त्याने कंपनीत बाँब ठेवल्याचं सांगत काही मिनिटात त्याचा स्फोट होईल, असा दावा केला.

पोलिसांकडून श्वान पथकाच्या मदतीने कंपनीची तपासणी

यानंतर कंपनीने या बाँब ठेवल्याच्या धमकीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी श्वान पथकासह कंपनीची तपासणी केली. यासाठी इमारतीतील ५०० कर्मचाऱ्यांना इमारतीतून बाहेर काढण्यात आलं. मात्र, या तपासणीत इमारतीत स्फोटकं नसल्याचं स्पष्ट झालं. तसेच बाँब ठेवल्याचा दावा फेक असल्याचं समोर आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर काढले होते ‘न्यूड सेल्फी’; पोलिसांना म्हणाला, “होय मी….”

आरोपी प्रसाद केरळमधील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर त्याच्यावर गुन्हाही नोंदवण्यात येणार आहे.