Shashi Tharoor tweet on Mahua Moitra Statement : काली चित्रपटाच्या पोस्टरवरून तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धर्माचं आचरण करणं ही वयक्तिक बाब असल्याचं मत शशी थरूर यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीटद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे.

शशी थरूर यांनी ट्विट करत म्हणाले, ”देशात ठरवून केलेले धार्मिक वाद माझ्यासाठी नवीन नाहीत. मात्र, महुआ मोईत्रा यांच्यावर ज्या प्रकारे आरोप सुरू आहे, त्याचे मला आर्श्चय वाटते. आपल्या देशात प्रत्येकाच्या उपासनेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. भक्त आपल्या देवाला जे नैवेद्य वगैरे देतात, ते देवांपेक्षा त्यांच्या भक्तांची भक्ती दर्शवतात.”

ते पुढे म्हणाले, ”आता आपण एका अशा ठिकाणी पोहोचलो आहोत, जिथे कोणीही जाहीरपणे बोलताना कोणाच्या धार्मिक भावना न दुखावता बोलू शकत नाही आहे. महुआ मोईत्रा यांना कोणाच्याही भावना दुखवायाचे नव्हते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मी प्रत्येक भारतीयाला आवाहन करतो, की त्यांनी गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष करावं आणि प्रत्येकाला आपआपल्या पद्धतीने उपासना करू द्यावी.”

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी काली या माहितीपटाच्या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना, ”माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते”, असे वक्तव्य केले होते. यावरूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती.

हेही वाचा – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, राज्यसभा खासदार म्हणून ‘या’ तारखेला संपणार कार्यकाळ