Aaftab Poonawala Narco Test: दिल्ली पोलिसांनी रविवारी श्रद्धा वालकर खून प्रकरणामध्ये दिल्ली जवळील छत्तरपूरच्या जंगल परिसरात नव्याने शोधमोहीम राबवली. तसेच आरोपी आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर राहत असलेल्या मेहरौली परिसरासह संपूर्ण शहरातही नव्याने तपास करण्यात आला. मंगळवारी आफताबच्या कोठडीची मुदत संपत असल्याने आजच आफताबची नार्को टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे.  पूनावालाच्या ‘नार्को’ चाचणीची परवानगी मिळाली आहे. सोमवारी रोहिणी उपनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ही चाचणी होण्याची शक्यता आहे. आफताबची पाच दिवसांची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्याने त्या आधीच नार्को चाचणीच्या माध्यमातून आतापर्यंत झालेल्या तपासाच्या आधारे आफताबकडून अधिक काही पुरावे मिळतात का याबद्दलचा शोध पोलीस घेणार आहेत.

नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी आफताब पूनावालाला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. काही प्रश्नांबाबत त्याची चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. त्याची नार्को चाचणी करण्यासही परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. याच निर्णयाच्या आधारे पुढील कोठडी वाढवून घेण्याआधीच पोलीस आज आफताबची नार्को टेस्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या नार्को चाचणीत आफताबला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात पाहूयात..

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…”

— तुझं पूर्ण नाव काय?

— तुझी जन्मतारीख काय?

— तू कुठे राहतोस?

— तुझा नेमका पत्ता काय?

— तुझ्या पालकांची नावं काय?

— तू कुठे नोकरी करतोस?

— तू श्रद्धा वालकरला ओळखतोस का?

— ती कुठे राहते?

— तू तिला कधी भेटला?

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: आफताब सिरीयल किलर? ड्रग्जच्या व्यवसायातही सहभाग? त्याच्या ओळखीतील मुलींचा शोध सुरु

— तू तिला कसा ओळखतोस?

— तू श्रद्धाला तिच्या घरी भेटायला जायचा का?

— तुझं तिच्याबरोबरचं नातं कसं होतं?

— तुम्ही किती काळ एकत्र राहत होता?

— तुझ्या आणि श्रद्धाच्या नात्यासंदर्भात तिचे कुटुंबिय समाधानी होते का?

— तुझे पालक या नात्याबद्दल समाधानी होते का?

— तुम्ही मुंबईत कुठे रहायचा?

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “या खुनात आफताबच्या कुटुंबियांचाही सहभाग, आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा…”; श्रद्धाच्या वडिलांचं विधान

— तू २०२० साली नोव्हेंबर महिन्यात श्रद्धाशी भांडला होतास का?

— या भांडणाचं कारण काय होतं?

— तू मुंबई सोडून नंतर कुठे गेलास?

— तू दिल्लीला कधी पोहोचलास?

— दिल्लीत तू नेमका कुठे कुठे वास्तव्यास होतास?

— तू मेहरौली परिसरात नेमका कधीपासून रहायला आलास?

— तू श्रद्धाला कधी आणि का मारलं?

— १८ मे रोजी नेमकं काय घडलं?

— तू तिच्याबरोबर भांडलास का?

— तू का भांडलास?

— तू तिच्यावर इतका का संतापलास?

नक्की वाचा > Shraddha Murder Case: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे… इतकं क्रूर कृत्य करणाऱ्या आफताबबद्दल मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, “अनेकदा अशा…”

— तू श्रद्धाचा खून कोणत्या ठिकाणी केलास?

— तू त्यावेळी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का?

— तू तिला कसं मारलं?

— ती मेल्यानंतर तू काय केलं?

— मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासंदर्भातील माहिती तू गुगलवर शोधलीस का?

— तू तिच्या मृतदेहाचे तुकडे केलेस का?

— तिच्या मृतदेहाचे तू किती तुकडे केलेस?

— तू मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कोणतं हत्यार वापरलं?

— तू हे मृतदेहाचे तुकडे नेमके कुठे फेकलेस?

— हत्या झाली तेव्हा इतर कोणी तिथं उपस्थित होतं का?

— तू याआधीही तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होतास का?

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “या खुनात आफताबच्या कुटुंबियांचाही सहभाग, आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा…”; श्रद्धाच्या वडिलांचं विधान

— तू तिचा फोन कुठे फेकलास?

— तिने हत्येच्या दिवशी घातलेली कपडे कुठे आहेत?

— तिची हत्या ज्या हत्याराने केली ते कुठे आहे?

— मृतदेहाच्या सर्व तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तुला किती कालावधी लागला?

— पुरावे नष्ट करण्यासाठी तू दिल्लीबाहेर गेला होतास का?

— श्रद्धाची हत्या केल्यानंतर तू दुसऱ्या महिलेला घरी आणलं होतं का?

— तुझी या इतर महिलांशी ओळख कशी झाली?

— तू श्रद्धाच्या हत्येसंदर्भात कोणाला सांगितलं का?

— श्रद्धाच्या हत्येनंतर तू घरी आणलेली ती मुलगी कोण होती?

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”

— ही हत्या तू ठरवून केलीस की रागाच्याभरात हे सारं घडलं?