उत्तर प्रदेशात एक संतापजनक घटना घडली आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थींनीना मोफत किंवा अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवले जातात. त्यामुळे भरवर्गात एखाद्या विद्यार्थींनीने सॅनटरी नॅपकिन्स मागितला तर तो वेळेत उपलब्ध करून देणे संस्थेचे कर्तव्य आहे. पण उत्तर प्रदेशातील एका महाविद्यालयात विद्यार्थीनीने परीक्षेच्या काळात सॅनिटरी नॅपकिन मागितला म्हणून तिला तासभर वर्गाबाहेर उभं राहण्यास सांगितलं हतं. याप्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

उत्तर प्रदेशातील एका महाविद्यालयात इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने परीक्षेदरम्यान सॅनिटरी पॅडचमी मागणी केली. याला शिक्षा म्हणून तिला वर्गाबाहेर तासभर उभं राहण्यास सांगितलं. या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हे महाविद्यालय मुलींचे विद्यालय आहे. मासिक पाळी सुरू झालेल्या विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांकडे मदत मागितली. शनिवारी ही घटना घडली. पण तिला मदत करण्याऐवजी, तिच्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि तिच्याशी गैरवर्तन केले गेले, असा दावा केला जात आहे.

वडिलांकडून सर्वत्र तक्रार

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ती परीक्षेसाठी गेली असता तिला मासिक पाळी सुरू झाली. मुख्याध्यापकांकडून सॅनिटरी पॅडची विनंती केल्यावर, तिला कथितपणे वर्गातून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आणि सुमारे एक तास बाहेर उभे राहण्यास सांगण्यात आले, असे तक्रारदाराने सांगितले. वडिलांनी जिल्हा दंडाधिकारी, शाळांचे जिल्हा निरीक्षक (DIOS), राज्य महिला आयोग आणि महिला कल्याण विभागाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा निरिक्षक देवकी नंदन यांनी पुष्टी केली की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि निष्कर्षांवर आधारित कारवाई केली जाईल.