भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे लोकसभेची निवडणूक नेमके कुठून लढविणार? याबाबत असलेला संभ्रम भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या उद्या(गुरूवार) होणाऱया बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदींनी वाराणसी येथून निवडणूक लढवावी अशी मोदी समर्थकांनी इच्छा आहे. परंतु, उत्तरप्रदेशातून मोदींची उमेदवारी जाहीर करण्याचीही चर्चा भाजपच्या गोटात सुरू होती. त्यामुळे मोदींच्या निवडणुक मतदार संघात असलेला संभ्रम उद्याच्या बैठकीत दूर होण्याचे संकेत आहेत. वाराणसीत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मुरली मनोहर जोशींची उमेदवारी जाहीर होण्याचीही दाट शक्यता आहे किंवा मोंदीसाठी जोशींना वाराणसी सोडण्यास सांगितले, तर जोशींना कानपूरचा पर्याय स्विकारावा लागण्याचीही शक्यता आहे.