भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांना विनाकारण गुंतवलेल्या इस्रो हेरगिरी प्रकरणातील पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यात केरळच्या माजी पोलीस महासंचालकांचाही समावेश आहे. केरळ उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच पाचही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – देशात कुठल्या राज्यात सर्वाधिक व सर्वात कमी बेरोजगारी? महाराष्ट्राची स्थिती काय? वाचा…

या याचिकेवर न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर २८ नोव्हेंबर सुनावणी झाली होती. दरम्यान, आज यासंदर्भातील निर्णय न्यायालयाने जाहीर केला. तसेच हे प्रकरण पुन्हा केरळ उच्च न्यायालयाकडे पाठवत यावर चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. याचबरोबर जोपर्यंत केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक करू नये, असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – वंदे भारत एक्स्प्रेसचा पुन्हा अपघात, गुरांना धडकल्यामुळे समोरच्या भागाचे नुकसान

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केरळ उच्च न्यायालयाने गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आरबी श्रीकुमार, केरळचे माजी पोलीस महासंचालक सीबी मॅथ्यूज, अन्य दोन पोलीस अधिकारी एस विजयन आणि थंपी एस दुर्गा दत्त तसेच गुप्तचार विभागाचे निवृत्त अधिकारी पीएस जयप्रकाश यांना इस्रो हेरगिरी प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. याविरोधात सीबीआयतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास चौकशीवर प्रभाव पडू शकतो, असे सीबीआयकडून न्यायालयात सांगण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court reject anticipatory bail for four accused of allegedly framing isro scientist nambi narayanan spb
First published on: 02-12-2022 at 17:25 IST