Supreme Court : पुरुष आणि महिलेचे प्रेमसंबंध सहमतीने असतील आणि त्यानंतर या दोघांचं ब्रेक अप झालं तर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. प्रेमसंबंध आहेत, लग्न झालं नाही, तर ब्रेक अप झालं म्हणून पुरुषावर गुन्हा दाखल करता येणार नाही असं एका प्रकरणावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) म्हटलं आहे. एका महिलेने तिच्या प्रियकराने लग्नाचं वचन देऊन वारंवार बलात्कार केला अशी तक्रार दिली होती हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होतं त्या प्रकरणात हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) दिला आहे.

न्यायालयाने काय म्हटलं आहे?

न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर यांच्या खंडपीठाने ( Supreme Court ) एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. त्यांनी सांगितलं ज्या नात्यात सहमतीने प्रेमसंबंध ठेवण्यात आले आहेत, शारिरीक संबंध प्रस्थापित झाले आहेत अशा नात्यांमध्ये ब्रेक अप झालं म्हणजेच ते नातं तुटलं म्हणून पुरुषावर बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होणार नाही. अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा रंग देता येणार नाही.

हे पण वाचा- दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे प्रकरण?

तक्रारकर्त्या महिलेने २०१९ मध्ये एक FIR दाखल केली होती. ज्यामध्ये तिने हा आरोप केला होता की तिच्या प्रियकराने लग्नाचं वचन देऊन तिच्यावर बलात्कार केला, लैंगिक शोषण केलं. त्याने बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. तसंच त्याने आपल्याला धमकी दिली होती की लैंगिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या कुटुंबाला मी इजा पोहचवेन. तक्रारदार महिलेच्या या तक्रारीनंतर कलम ३७६ (२) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून याचिकाकर्त्याने अर्ज दाखल केला होता. त्यासाठी आधी दिल्ली उच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) गेलं. सर्वोच्च न्यायालयाने महिलेने केलेले आरोप तथ्यहीन आहेत असं म्हटलं आहे. तसंच न्यायालयाने तक्रारदार महिलेला हा प्रश्नही विचारला की जर याचिकाकर्ता बलात्कार करत होता, लैंगिक शोषण करत होता तरीही तू त्याला का भेटत होतीस? दोघंही सज्ञान असल्याने त्यांच्यात सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित झाले. लग्नाचं वचन देऊन हे सगळं सुरु झालं याचा कुठलाही संकेत आढळला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) या प्रकरणात लैंगिक शोषण किंवा बलात्काराचा गुन्हा नोंदवता येणार नाही असं म्हटलं आहे. लाईव्ह लॉ ने हे वृत्त दिलं आहे.