दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नुकतेच त्यांच्या वडीलांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, त्यांच्या लहानपणी त्यांचे वडील त्यांना नेहमी मारहाण करायचे, लैंगिक शोषण करायचे. वडीलांवर असा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, मालीवाल यांचं एक जुनं ट्वीट चर्चेत आलं आहे. हे ट्वीट पाहून नेटीझन्स मालीवाल यांच्यावर संतापले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालीवाल यांनी म्हटलं होतं की, माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे, मारहाण करायचे. वडिलांच्या भितीने मी तासनतास खाटेखाली लपून बसायचे. परंतु या आरोपांनंतर त्यांचं एक जुनं ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, त्यांचे वडील एक सैनिक आहेत.

नेटीझन्स संतापले

व्हायर होत असलेल्या ट्वीटमध्ये स्वाती मालीवाल यांनी लिहिलं आहे की, मी एका सैनिकाची मुलगी आहे. मी देखील त्याच वातावरण वाढले आहे. देशासाठी काम करणं आणि देशासाठी मरणं हेच मी शिकले आहे. जगातली कोणतीही ताकद मला घाबरवू शकत नाही. त्यांचं हे ट्वीट ट्विटरवर @Prakharshri78 (प्रखर श्रीवास्तव) या युजरने शेअर केलं आहे.

ट्विटर युजर प्रखर श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे की, तुम्ही तुमच्या पित्यावर लैंगिक छळाचे आरोप करत आहात. मग २०१६ पर्यंत ज्या पित्याचा तुम्हाला अभिमान होता ते कोण होते. मला विश्वास आहे की, कोणतीही मुलगी आपल्या पित्याबद्दल खोटं बोलणार नाही. परंतु यातलं खोटं काय आहे? तुम्हाला उत्तर द्यावं लागेल कारण तुम्ही जगातल्या सर्वात पवित्र नात्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे

हे ही वाचा >> “राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या!” भाजपा नेत्याची मागणी, जमीनही सुचवली

पाहा काय म्हणाल्या होत्या स्वाती मालीवाल?

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swati maliwal expressed pride for father in army now accuses sexual assault asc
First published on: 12-03-2023 at 18:10 IST