अफगाणिस्तानमध्ये पंजशीर येथे नॅशनल रेसिस्टन्स फोर्स (अहमद मसूद गट) आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरु आहे. मात्र आता तालिबान्यांसमोर नॅशनल रेसिस्टन्स फोर्स (एनआरएफ) कमकूवत पडताना दिसत आहे. टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार एनआरएफचे प्रमुख अहमद मसूदने तालिबानविरोधातील युद्ध संपवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ही चर्चा घडवून आणण्यासाठी आधी तालिबानने पंजशीर आणि अंदाराबमधील हल्ले थांबवावेत असं म्हटलं आहे. असं असतानाच अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानला मान्यता द्यावी की नाही यासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका स्पष्ट नसतानाच जागतिक स्तरावरील या सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक असणाऱ्या युएनकडून तालिबानला मोठा दिलासा मिळाला आहे. अफगाणिस्तानला आमची मदत मिळत राहील असं यूएनने स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> “…म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच”; शिवसेनेनं जावेद अख्तर यांना सुनावलं

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी

देशात सरकार स्थापन करण्याआधी तालिबानचा नेता मुल्ला बरादरने रविवारी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या मानवी मुल्यांसंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे अवर महासचिव मार्टिन ग्रिफिथ्स यांची भेट घेतली. भेटीनंतर तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद नईमने ट्विटरवरुन मार्टिक ग्राफिथ्स यांनी संयुक्त राष्ट्रांकडून अफगाणिस्तानला आपलं समर्थन आणि सहकार्य सुरु ठेवणार असल्याचं सांगितलं.

नक्की वाचा >> “तालिबानसोबत पडद्यामागे लपून लपून…”; ओवेसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मार्टिक ग्राफिथ्स यांनी ट्विटरवरुन अफगाणिस्तानमध्ये लाखो गरजू आणि निष्पक्ष लोकांसाठी मदत आणि सुरक्षा पुरवण्यासाठी संयुक्त राष्ट्र बांधील असल्याचा दाखला देत याचसाठी मी तालिबानी नेतृत्वाची भेट घेतल्याचं सांगितलं.

नक्की वाचा >> तालिबानचं अभिनंदन करताना ‘अल-कायदा’ने केला काश्मीरचा उल्लेख; म्हटलं, “इतर इस्लामिक प्रदेशही…”

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेचा निर्णय या आठवड्याच्या समाप्तीपर्यंत घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने शनिवारी यासंदर्भातील माहिती दिली. तालिबानला एक व्यापक आणि सर्वसामावेशक सरकार देण्यामध्ये अडचणी येत असल्याने सत्ता स्थापनेसंदर्भात जपून पावले टाकली जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरामधून मान्यता मिळावी असं सरकार देण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे.

तालिबानने शनिवारी काबूलमध्ये नवीन सरकार स्थापन करत असल्याची घोषणा करण्याची अपेक्षा होती. मात्र तसं काहीही घडलं नाही. सत्ता स्थापनेसाठी तालिबान्यांना आणखीन वेळ हवा असल्याचं शनिवारी स्पष्ट झालं. समोर आलेल्या माहितीनुसार तालिबानचा सह संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बारादरच्या हातात सत्तेची सूत्र असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. तालिबानने १६ ऑगस्ट रोजी काबूलमधील राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करुन सत्ता काबीज केल्यावर सत्ता स्थापनेची तारीख पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. या सुरु असणाऱ्या आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तालिबानकडून मंत्रालयांची जबाबदारी कोणाकडे देण्यात आलीय यासंदर्भातील घोषणा होण्याची अपेक्षा आहे.