मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तो पाकिस्तानमधल्या तुरुंगात ७८ वर्षांची शिक्षा भोगतोय, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे. यूएनने म्हटलं आहे की, हाफिज सईद हा दहशतवादी १२ फेब्रुवारी २०२० पासून शिक्षा भोगतोय. त्याला ७८ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिंगच्या (दहशतवादी कारवायांसाठी पुरवले जाणारे पैसे) सात वेगवेगळ्या प्रकरणांमध्यो त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला भारताच्या अनेक तपास यंत्रणा आणि गुप्तचर संस्था गेल्या अनेक वर्षांपासून हाफिजच्या मागावर आहेत.

दहशतवादी कारवायांमधील सहभाग आणि त्यासाठी अर्थसहाय्य केल्याप्रकरणी हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. हाफिज सईदला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे.

Prime Minister Narendra Modi with Maldivian President Mohamed Muizzu at the banquet for the foreign heads of states invited to the oath-taking ceremony of the Modi 3.0 government.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोदींच्या शेजारी; मेजवानी सोहळ्यातील ‘त्या’ फोटोची चर्चा!
jp nadda
घटक पक्षांमध्ये मंत्रिपदांसाठी चुरस
A sign of major organizational change in the BJP
भाजपमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलाचे संकेत; पक्षाध्यक्षपदासाठी यादव, खट्टर, चौहान यांचा विचार
modi third swearing ceremony
मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रण, निमंत्रणांचे महत्त्व काय?
MVA Celebration Pakistani Flag Video
मविआच्या जल्लोषात पाकिस्तानी झेंडे फडकले? नगरच्या Video चा नाशिकशी संबंध? मुस्लिम कार्यकर्त्यांच्या हातात होतं तरी काय, पाहा
Prime Minister Narendra Modi hat trick prediction in post poll tests
भाजप आघाडी ३५० पार; मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅट्ट्रिकचा अंदाज
Sri Lanka to release 43 pakistani prisoners
श्रीलंकन सरकार ४३ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करून मायदेशी पाठवणार, दोन्ही देशांमध्ये मोठा करार
arvind kejriwal
कॅनडा, ऑस्ट्रेलियासह अरब राष्ट्रांमधून AAP ला अवैध निधी; ईडीने गृहमंत्रालयाला सोपवला अहवाल

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने गेल्या महिन्यात अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही नोंदींमध्ये बदल केले आहेत. यामध्ये दहशतवादी संघटना, त्यांचे सदस्य, सपंत्ती, त्यांच्यावरील बंदी, त्यांच्याकडे असणाऱ्या शस्त्रास्रांबाबतची माहिती अपडेट केली होती. त्यामधून हाफिज सईदबाबतची माहिती मिळाली आहे. सईदबाबत यूएनने म्हटलं आहे की, दहशतवादी हाफिज सईद टेरर फंडिंगच्या ७ प्रकरणांमध्ये दोषी आढळला आहे आणि तो सध्या तुरुंगात ७८ वर्षांची शिक्षा भोगतोय.

हे ही वाचा >> “…म्हणून कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश दिले होते”, सपा नेत्याने सांगितलं ३० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं?

दरम्यान, यूएनने लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेच्या संस्थापकांपैकी एक हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीला मृत घोषित केलं आहे. भुट्टावी याचा मे २०२३ मध्ये पाकिस्तानमधील तुरुंगात हुदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. भुट्टावी हा २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक होता. भुट्टावी टेरर फंडिंगप्रकरणात दोषी आढळा होता. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याचा मृत्यू झाला.