शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या सूत्राच्या बाहेर जाऊन निर्णय दिल्याने त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाच्या वतीने १५ जानेवोरी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली होती. आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. Live Law ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या आठवड्यात निर्णय देताना शिंदे गटाला दिलासा दिला होता. दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवीत शिवसेना पक्ष शिंदे यांचाच, असा निर्वाळा दिला होता. नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुभाष देसाई विरुद्ध विधिमंडळ सचिवालय या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मे महिन्यात निकाल देताना कोणत्या मुद्द्यावर अपात्रतेवर निर्णय घ्यावा याच्या मार्गदर्शक सूचना ठरवून दिल्या होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन अध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल दिल्याचा आक्षेप ठाकरे गटाने घेतला आहे.

EX Jharkhand CM Hemant Soren Moves sc for bail
हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकेविरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा आरोप 
Ramdev Baba
“आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
Supreme Court grants bail to YouTube vlogger arrested on charges of insulting Tamil Nadu Chief Minister MK Stalin
निवडणुकीआधी किती जणांना तुरुंगात टाकणार? सर्वोच्च न्यायालयाकडून ‘यूटय़ूब व्लॉगर’ला जामीन देताना विचारणा
Supreme Court Grants Conditional Bail to former professor Shoma Sen in Bhima Koregaon Case
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन, या अटी घातल्या…

हेही वाचा >> शिंदे गटाच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाला धक्का, ‘या’ प्रकरणी बजावली नोटीस

दरम्यान, याप्रकरणी १९ जानेवारी, शुक्रवारी सुनावणी होणार होती. परंतु, याप्रकरणी २२ जानेवारी, सोमवारी सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे मागणी केली. ही मागणी मान्य झाली असून आता सोमवारी सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस

दरम्यान, नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आज (१७ जानेवारी) सुनावणी झाली. या सुनावणीवेळी खंडपीठाने राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. या नोटीशीला ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, सर्वोच्च न्यायालयातही याप्रकरणी सुनावणी सुरू आहे का, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केली आहे.