पीटीआय, नवी दिल्ली

बीबीसीचे भारतातील कामकाज आणि त्यांचे उत्पन्न, नफा यांचा एकमेकांशी मेळ बसत नाही असा दावा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीडीबीटी) केला आहे. बीबीसीच्या काही परकीय संस्थांनी केलेल्या काही विशिष्ट निधी हस्तांतरणांवर कर भरला गेलेला नाही, आयकर विभागाने यासंबंधी अनेक पुरावे गोळा केले आहेत, असे सीडीबीटीने स्पष्ट केले आहे.

आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयांमध्ये ‘सर्वेक्षण’ केले. मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस ही कारवाई सुरू होती.
सीडीबीटीने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध करून याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मात्र त्यामध्ये बीबीसीचा उल्लेख केलेला नाही. त्याऐवजी इंग्रजी, हिंदूी आणि भारतीय भाषांमध्ये आशय निर्मिती करण्याच्या व्यवसायातील प्रमुख आंतरराष्ट्रीय माध्यम कंपनी असे वर्णन करण्यात आलेले आहे. बीबीसीच्या इंग्रजीव्यतिरिक्त अनेक भाषांमधील आशयाची लक्षणीय प्रमाणात विक्री होत असली तरी त्यांनी दाखवलेले उत्पन्न त्याच्याशी जुळत नाही, असे सीडीबीटीचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईदरम्यान, कंपनीने बराच वेळकाढूपणा केला असे नमूद करून बीबीसीवर सहकार्य न केल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे करण्यात आला आहे. तर, आयकर विभागाशी यापुढेही सहकार्य करत राहू, हे प्रकरण लवकरात लवकर निवळेल अशी आशा आहे असे बीबीसीकडून सांगण्यात आले.