कोविडनंतर आलेल्या आर्थिक आपत्तीतून सावरण्यासाठी अनेक देशांकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. विविध धोरणांची अंमलबजावणी करून देशाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केला जातोय. पर्यटनाला चालना देऊनही देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचनिमित्ताने एका देशाने चक्क सात देशांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सात देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने भारतासह सात देशांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासह रशिया, चीन, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि जपान या सहा देशांतील पर्यटकांनाही श्रीलंकेचा व्हिसा मोफत मिळणार आहे.

हेही वाचा >> ‘व्हिसा शॉपिंग’ म्हणजे काय ? युरोपियन देशांमधील प्रवासासाठी हे आवश्यक आहे का ?

भारत, चीन, रशिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांना ३१ मार्च २०२४ पर्यंत मोफत व्हिसा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे, अशी माहिती श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली सॅब्री यांनी मंगळवारी दिली. कोणत्याही शुल्काशिवाय या सात देशांतील पर्यटक श्रीलंकेचा व्हिसा मिळवू शकणार आहेत.

२०२६ पर्यंत श्रीलंकेने ५० लाख पर्यटकांचं उद्दिष्ट्य ठेवलं आहे, त्यानिमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या पर्यटनासाठी भारत हा एक उत्तम स्रोत आहे. श्रीलंका पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी २ लाख ३१० भारतीय पर्यटक श्रीलंकेत गेले होते. तर, १ लाख ३२ हजार ३०० चीन पर्यटक श्रीलंकेत पर्यटनासाठी गेले होते.

२०१९ पासून श्रीलंकेत आर्थिक संकट

२०१९ मध्ये इस्टर संडेदरम्यान मोठा बॉम्ब हल्ला झाला होता. त्यानंतर, २०२० मध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे देशात अनेक व्यवसायांसह पर्यटन व्यवसायही ठप्प झाला होता. परिणामी देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. देशाची अर्थव्यवस्था ढासाळली असून महत्त्वाच्या खर्चांसाठीही पैसे उरले नसल्याची कबुली श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिली होती.

हेही वाचा >> तुम्ही व्हिसाशिवाय फिरु शकता ‘हे’ ५ सुंदर देश; फक्त पासपोर्ट ठेवा जवळ

कोविडपूर्वी पर्यटन हा श्रीलंकेसाठी महत्त्वाचा व्यवसाय होता. परकीय चलनासाठी पर्यटन हा तिसरा महत्वाचा स्रोत होता. तर,देशाच्या एकूण जीडीपीमध्ये ५ टक्के जीडीपीचा वाटा पर्यटनाचा आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत श्रीलंकेत १० लाखांहून अधिक पर्यटन दाखल झाले होते. कोविडनंतरची ही सर्वांत मोठी संख्या आहे. तर, गेल्या आठ महिन्यांत पर्यटनाच्या माध्यमातून १.३ डॉलर बिलिअन व्यवहार पर्यटनाच्या क्षेत्रात झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेने आता पर्यटनाकडे जास्त लक्ष दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This country offers free visas to indians to revive tourism sgk
First published on: 25-10-2023 at 13:41 IST