दोषींमध्ये एका महिलेचा समावेश

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील सत्र न्यायालयाने शुक्रवारी एका महिलेसह तिघांना सहा वर्षांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. भय्यू महाराज यांनी तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

भय्यू महाराज (५०) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पलक पुराणिक (२८), विनायक दुधाडे (४५) आणि शरद देशमुख (३७) यांना दोषी ठरवण्यात आले होते. या तिघांनाही अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १२० बी (गुन्हेगारी कट), ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ३८४ (खंडणी) यानुसार शिक्षा सुनावली.

भय्यू महाराज (मूळ नाव उदयसिंग देशमुख) यांनी १२ जून २०१८ रोजी त्यांच्या परवानाप्राप्त रिव्हॉल्व्हरने आपल्या बंगल्यातच गोळी झाडून आत्महत्या केली होती.

भय्यू महाराज हे एक वलयांकित आध्यात्मिक असामी होते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे राजकारणी नेते त्यांचे अनुयायी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 त्यांच्या मृत्यूनंतर सात महिन्यांनी पुराणिक, दुधाडे आणि शरद देशमुख यांना अटक करण्यात आली होती.