scorecardresearch

गेल्या दोन दशकांच्या तुलनेत २०२२ मध्ये सर्वाधिक आरोपींना फाशीची शिक्षा, तब्बल १६५ जणांना मृत्यूदंड!

वर्ष २०२२ मध्ये देशातील सत्र न्यायालयांनी १६५ आरोपींना वेगवेगळ्या खटल्यांत मृत्यूदंड सुनावला आहे.

court
सांकेतिक फोटो

वर्ष २०२२ मध्ये देशातील सत्र न्यायालयांनी १६५ आरोपींना वेगवेगळ्या खटल्यांत मृत्यूदंड सुनावला आहे. मागील दोन दशकांमध्ये दिल्या गेलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. नॅशनल लॉ विद्यापीठाच्या प्रोजेक्ट ३९ ए अंतर्गत ‘डेथ पेनाल्टी इन इंडिया, अॅन्यूअल स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट २०२२’ नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात वरील माहिती दिलेली आहे.

हेही वाचा >>> “तर २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी – अमित शहांना तुरुंगात टाकू”, प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

१६५ आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा

या अहवालानुसार न्यायपालिकेने २०२२ या साली १६५ आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. मागील दोन दशकांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. २०२१ साली सत्र न्यायालयांनी १४६ आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. २०२२ साली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या १६५ आरोपींपैकी तीन जणांतील एकावर लैंगिक अत्याचाराचाराच्या आरोपाशी संबंधित आरोप आहेत.

हेही वाचा >>> Arvind Kejriwal Death Threat : अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी!

एका खटल्यात तब्बल ३८ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा

मागील वर्षी अहमदाबाद येथील सत्र न्यायालयाने बॉम्ब स्फोटाच्या एका खटल्यात तब्बल ३८ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. याच कारणामुळे २०२२ सालातील मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या आरोपींमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. याआधी २०१६ साली एकाच खटल्यात एवढ्या साऱ्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 13:40 IST