Coronavirus Omicron India : भारतात काल दिवसभरात १,४९,३९४ नवीन कोविड-१९ रुग्ण आढळले असून पाच लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एका दिवसात १,०५२ रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत मृतांची संख्या ५,००,०५५ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
करोनाच्या डेल्टा प्रकाराच्या संसर्गामध्ये जागतिक स्तरावर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. देशात गेल्या वर्षी जुलैपर्यंत ४ लाख मृत्यूची नोंद झाली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, काही तज्ञांच्या मते ही आकडेवारी खूपच जास्त होती.भारताच्या १.३५ अब्ज लोकसंख्येपैकी ३% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये देशातील एकूण मृत्यूंपैकी ११% मृत्यू आहेत.
Coronavirus Omicron India : गेल्या २४ तासांत भारतात १,४९,३९४ नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. देशाचा रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर ९.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
एका महिन्यात देशातल्या १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या ६५ टक्के पात्र लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या तरुणांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. आत्तापर्यंत देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची संख्या १६८ कोटी ४७ लाख १६ हजार ६८ वर पोहोचली आहे.
देशात काल दिवसभरात ५५ लाख ५८ हजार ७६० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी १८ वर्षांवरील ७ लाख ९० हजार ६८० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असून २५ लाख २७ हजार ६३८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ५ लाख ३१ हजार ८० असून ३४ लाख ९० हजार ०७४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर वर्धक मात्रा घेणाऱ्यांची संख्या ४ लाख २८ हजार ७५९ इतकी आहे.
भारतातील कोविड-१९ च्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेत, तुलनेने तरुण लोकसंख्येला जास्त संसर्ग झाला होता, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने हॉस्पिटल डेटामध्ये केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ICMR चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितले की, या अभ्यासासाठी देशभरातील ३७ रुग्णालयांमधून डेटा मिळवण्यात आला आहे. तिसर्या लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोनाबाधितांचं सरासरी वय सुमारे ४४ होते, तर पूर्वीचे सरासरी वय ५५ होते.
एका दिवसात १,०५२ रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत मृतांची संख्या ५,००,०५५ वर पोहोचली आहे.देशात गेल्या वर्षी जुलैपर्यंत ४ लाख मृत्यूची नोंद झाली आहे. भारताच्या १.३५ अब्ज लोकसंख्येपैकी ३% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये देशातील एकूण मृत्यूंपैकी ११% मृत्यू आहेत.
देशातली गेल्या २४ तासांतली करोना आकडेवारी खालीलप्रमाणे -
नवे करोनाबाधित - १,४९,३९४
बरे झालेल्या रुग्णांची संख्या -२,४६,६७४
उपचाराधीन रुग्णसंख्या- १४,३५,५६९
रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर-९.२७%
मृतांची संख्या- १,०७२
"सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आमच्या अभ्यासात तीन वेगवेगळ्या डेटाबेसचा वापर करून २०२१ च्या मध्यापर्यंत भारतात ३० दशलक्ष कोविड मृत्यू झाल्याचा अंदाज आहे," इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादचे सहाय्यक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक चिन्मय तुंबे यांनी रॉयटर्सशी बोलताना ही माहिती दिली.
भारतातील कोविड-१९ च्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेत, तुलनेने तरुण लोकसंख्येला जास्त संसर्ग झाला होता, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने हॉस्पिटल डेटामध्ये केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ICMR चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितले की, या अभ्यासासाठी देशभरातील ३७ रुग्णालयांमधून डेटा मिळवण्यात आला आहे.