कोलकाता :पंचायत निवडणुकांना सामोरे जात असलेल्या पश्चिम बंगालमधील हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचा एक कार्यकर्ता ठार, तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील इतर अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

जियारुल मुल्ला (५२) हा शनिवारी उशिरा रात्री घरी परतत असताना २४ परगणा जिल्ह्यात बसंती येथील फुलमलंचा भागात त्याला गोळय़ा घालून ठार मारण्यात आले. तृणमूलचा नेता अमरुल लास्कर याचा जवळचा साथीदार असलेला मुल्ला हा सत्ताधारी पक्षातील अंतर्गत भांडणांचा बळी ठरल्याचा दावा इंडियन सेक्युलर फ्रंटच्या (आयएसएफ) एका स्थानिक नेत्याने केला.

मुल्लाची मुलगी मनवरा ही काठलबेरिया ग्रामपंचायतीतल तृणमूलची उमेदवार आहे. पक्षाच्या प्रतिस्पर्धी गटाकडून धमक्या मिळाल्याची तक्रार आपल्या वडिलांनी पोलिसांकडे केली होती असे तिने सांगितले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपालांकडून आढावा

कूचबिहार :  पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी शनिवारी रात्रभरात निवडणूक हिंसाचार झालेल्या कूचबिहार जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.