अस्पृश्यतेला मुस्लिमांचे आक्रमण जबाबदार

अस्पृश्यतेला इस्लामिक आक्रमण जबाबदार आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. दलितांना सन्मान व समानतेची वागणूक मिळायला हवी, अशी अपेक्षा विहिंपचे मार्गदर्शक अशोक सिंघल यांनी येथील हिंदू संमेलनात व्यक्त केली.

अनेक शतकांपूर्वी इस्लामिक शासकांनी हिंदूना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती केली. त्या वेळी हिंदूंनी नकार दिला. मात्र आता हिंदूंनी दलित बांधवांना आदराची वागणूक देण्याची वेळ आल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. हिंदूंच्या धर्मातराच्या विरोधात पावले उचलणे गरजेचे असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. वाढत्या धर्मातरातून भौगोलिक असंतुलन निर्माण होत असल्याचा दावा सिंघल यांनी केला. या संमेलनाला भाजपचे नेते उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Untouchability due to oppression by islamic invaders ashok singhal