Video captures flash flood hit Uttarkashi Dharali : उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथ मंगळवारी ढगफुटी झाल्याने परिसरातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. या ढगफुटीच्या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झले आहे. यामध्ये अचानक आलेला पूर धराली येथील घरांवर आदळतानाचा एक भयानक व्हिडीओ देखील समोर आला आहे. थरकाप उडवणाऱ्या या व्हिडीओमध्ये परिसरातील अनेक लोक जीव वाचवून दूर पळताना दिसत आहेत. ज्यापैकी अनेक जण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
उत्तरकाशी येथे झालेल्या ढगफुटीमुळे उंच डोंगरांवर वसलेल्या गावांमध्ये अचानक पूर आला. उत्तरकाशीचे डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट प्रशांत आर्या यांनी सांगितले की किमान चार लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा आकाडा वाढण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत ढगफुटीच्या अशा एका व्हिडीओमध्ये स्थानिक लोक भीतीने आरडाओरड करताना ऐकू येत आहेत. दरम्यान या व्हिडीओमध्ये गावकरी आणि इमारती देखील पुराच्या पाण्यात वाहून जाताना पाहायला मिळत आहेत.
उत्तरकाशी धराली कस्बे में…. pic.twitter.com/m9fMAjBPLg
— atulsati joshimath (@atulsati1) August 5, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील परिस्थितीची दखल घेतली असून त्यांनी सांगितले की जवळच असलेली तीन आयटीबीपीची पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत आणि याबरोबरच चार एनडीआरएफ पथके देखील बचाव कार्यात तैनात करण्यात आली आहेत.
लोगों के भागने जान बचाने से पहले ही… pic.twitter.com/NZhsw5YZA9
— atulsati joshimath (@atulsati1) August 5, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील परिस्थितीची दखल घेतली आहे. त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासी संवाद देखील साधला. राज्य सरकारच्या देखरेखीखाली बचाव आणि मदत पथके शक्य ती सर्व मदत करत आहेत. लोकांना मदत करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.