गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दोऱ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सध्या मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर असून आधी जपान आणि नंतर पापुआ न्यू गिनी या देशांना त्यांनी भेटी दिल्या. यानंतर आता मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांदरम्यान, इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदींचा केलेला सन्मान आणि त्याचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. यावरून आता ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली असून ती चर्चेत आली आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सध्या चालू असणाऱ्या दौऱ्यात आधी जपानला भेट दिली. त्यानंतर मोदी पापुआ न्यू गिनी देशात गेले. तिथले पंतप्रधान जेम्स मारापे स्वत: मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मोदींचं स्वागत करताना जेम्स मारापे यांनी त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. याशिवाय, फिजी देशाने मोदींना त्यांच्या राष्ट्राता सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतात मोदींच्या या विदेश दौऱ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

विवेक अग्निहोत्रींनी पोस्ट केले दोन फोटो!

दरम्यान, पापुआचे पंतप्रधान मोदींच्या पाया पडतानाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोदींच्या भेटीवेळी अमेरिकन नागरिकांना मोठ्या प्रमाणावर भेटीच्या स्थळाची तिकिटं खरेदी केली असून आता तिकिटं शिल्लक नसल्याची दिलेली प्रतिक्रियाही चर्चेचा विषय ठरत आहे. हे दोन फोटो पोस्ट करून विवेक अग्निहोत्रींनी मोदींचं कौतुक करणारी पोस्ट ट्विटरवर केली आहे.

PM Modi in Sydney: सिडनीतील मराठी असोसिएशनमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागताचा उत्साह!

“गेल्या काही वर्षांत जागतिक पटलावर भारताला भूतकाळात कधीच नव्हता इतका सन्मान आणि महत्त्व मिळू लागलं आहे. २०१४पूर्वी आपले नेते जागतिक स्तरावर एका कोपऱ्यात खाली पडलेल्या खांद्यांनिशी आणि हातात भीक मागण्यासाठीची वाटी घेऊन उभे असल्याचं आपण पाहात होतो. तेव्हा भारत फक्त आणखीन एक असा अतीलोकसंख्या असणारा विकसनशील देश होता ज्याचं पाकिस्तानशी शत्रुत्व होतं”, असं अग्निहोत्रींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“अमेरिकेचं भारतप्रेम कित्येक पटींनी वाढलं”

“२०१४पूर्वी कोणतीही ‘इंडिया स्टोरी’ अस्तित्वात नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सगळं बदलून टाकलं. त्यांनी जगाला एक विश्वासार्ह अशी ‘इंडिया स्टोरी’ सांगितली. फक्त आश्वासन नाही, तर अंमलबजावणीच्या पातळीवरही. तुमची अर्थव्यवस्था मजबूत नसेल, तर कोणताही देश तुम्हाला किंमत देत नाही. अमेरिकेसारखा भांडवलशाही देश त्यांचा फायदा होत नसेल, तर तुम्हाला किंमत देत नाही. मग ते ट्रम्प असोत किंवा बायडेन. पण अमेरिकेचं भारतावरचं प्रेम अनेक पटींनी वाढल्याचं आपण पाहिलंय”, असंही अग्निहोत्रींनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

“करोना काळात खरा बदल झाला. अनेक संघटना आणि आपल्याच काही लोकांनी आपल्याला निकालात काढलं होतं. सर्वाधिक मृत्यू भारतात होतील, असा आंदाज बांधला गेला. पण ते खोटं ठरलं. विदेशी लस आणि औषध जगताकडून भारताविरोधात युद्धच छेडलं गेलं होतं. भारतातील अनेक शक्तीशाली गटांकडून त्यांना मदत केली गेली. चीन, अमेरिका, आंतरराष्ट्रीय लॉबिस्ट, WHO यांनी विरोधी किंवा असहकाराची भूमिका घेतली. मात्र, तरीही आपण यापुढे गुडघे न टेकता फक्त जगातील सर्वात वेगवान लस बनवली नाही, तर संपूर्ण भारतीय बनावटीची लस बनवून नागरिकांना ती मोफत उपलब्ध करून दिली”, अशा शब्दांत अग्निहोत्रींनी मोदी सरकारच्या करोना काळातील कामगिरीचं कौतुक केलं आहे.

“पहिल्यांदाच देशातील नागरी मूल्यांचं कौतुक होतंय”

“स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतातील नागरी मूल्यांचं कौतुक होत आहे. त्यामुळेच जगातील नेते एकतर भारतीय पंतप्रधानांचे आशीर्वाद तरी घेत आहेत किंवा त्यांना आलिंगन देण्यासाठी उत्सुक तरी आहेत. देशाच्या पंतप्रधानांना दिलेलं आलिंगन हे भारताला दिलेलं आलिंगन आहे. आपल्या सगळ्यांना, आपल्या भविष्याला दिलेलं आलिंगन आहे”, असंही या पोस्टच्या शेवटी विवेक अग्निहोत्रींनी म्हटलं आहे.