देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. पाच राज्यांपैकी आज पंजाबमधील सर्व ११७ जागांसाठी मतदान होत असून उत्तर प्रदेशातील ५९ जागांसाठी आज, रविवारी मतदान सुरू झालंय. उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून तेथे मतदानाचे सात टप्पे आहेत. तर पंजाबमध्ये आज एकाच दिवशी पूर्ण मतदान होईल. पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये लोक मत देण्यासाठी मतदान केंद्रांवर दिसून येत आहे.

९ वाजेपर्यंत पंजाबमध्ये ४.८० टक्के मतदारांनी तर उत्तर प्रदेशमध्ये ८.१५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
BJP Candidate Tenth List for Lok Sabha
मोठी बातमी! भाजपाचे पुन्हा धक्कातंत्र; चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, ‘या’ नव्या चेहऱ्यांना दिली संधी
owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी खरड येथील शिव मंदिरात पुजा केली. यावेळी पंजाबमध्ये चांगले आणि पारदर्शी सरकार यावे, यासाठी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं.

तर आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले भगवंत मान यांनी मतदानाचा हक्क बजावला असून पंजाबच्या लोकांनी त्यांच्या आवडत्या उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तर उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये नववधूने सासरी जाण्यापूर्वी पतीसोबत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

याशिवाय सुनिल जाखड, मनिष तिवारी, पंजाबचे शिक्षणमंत्री परगत सिंग यांच्यासह अनेक राज्य आणि केंद्रातील मंत्र्यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशात आज मतदानाचा हक्क बजावला.

पंजाबमधील राजकीय परिस्थिती –

पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असून यावेळी त्या पक्षाला आम आदमी पक्षाने आव्हान दिले आहे. त्याचबरोबर अकाली दल-बसप युती तसेच भाजपा-पंजाब लोक काँग्रेस आणि अकाली दल (संयुक्त) यांच्या आघाडीत लढत होणार आहे. पंजाबमध्ये दोन कोटी १४ लाख मतदार असून १३०४ उमेदवार रिंगणात आहेत.

पंजाब, उत्तर प्रदेशात आज मतदान

उत्तर प्रदेशमधील राजकीय परिस्थिती –

उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांतील ५९ मतदारसंघांत रविवारी मतदान होत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तेथेही मतदान होत आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री एस. पी. सिंह बघेल निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी या ५९ पैकी ४९ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला नऊ जागा जिंकता आल्या होत्या.