Vice President Jagdeep Dhankar: दिल्ली-नोएडा सीमेवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना खडे बोल सुनावले. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? असाही सवाल धनकड यांनी विचारला. मुंबई येथे एका कार्यक्रमात बोलत असताना शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रती चिंता व्यक्त केली. आपण शेतकरी आणि सरकारमध्ये सीमा आखत आहोत का? आजवर शेतकऱ्यांशी संवाद का साधला गेला नाही? असे प्रश्न जगदीप धनकड यांनी उपस्थित केले.

हे वाचा >> “किमान सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या”, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे मागणी; दिल्लीत काय चर्चा झाली?

“मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की, तुम्ही अर्थव्यवस्थेचा कणा आहात. राजकारणावर तुमचा प्रभाव आहे. समाजाचे तुम्ही आधारास्तंभ आहात. तुम्हालाही संवादासाठी पुढे यावे लागेल. पण कृषी मंत्र्यांना मी एक चिंतेचा विषय सांगू इच्छितो की, तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांशी संवाद का नाही साधला. मला सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण येत आहे. देशाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली. आज तसेच आव्हान शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर आहे. हे देशाची एकता अबाधित ठेवण्याएवढेच आव्हान आहे. त्याला कमी समजू नये”, असेही ते म्हणाले.

“शेतकरी आंदोलन जेवढे रस्त्यावर दिसते, तेवढेच नाही. शेतकऱ्याचा मुलगा आज अधिकारी आहे, तो सुरक्षा दलात आहे. म्हणूनच लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती आमचा दृष्टीकोन जवानांसारखाच असला पाहीजे”, असे आवाहन जगदीप धनकड यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगदीप धनकड यांनी काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याच सरकारला खडे बोल सुनावले. पण आज राज्यसभेत काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मात्र जगदीप धनकड यांनी आक्षेप घेतला. केंद्र सरकार शेतकऱ्यांची शत्रू आहे, असा आरोप तिवारी यांनी केला होता. त्यावर हे संसदीय शब्द असल्याचे धनकड यांनी सांगितले.