Wife Kills Husband एका महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून तिच्या पतीला ठार केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हत्या प्रकरण आणि तेलंगणातील तेजेश्वर हत्या प्रकरण ताजं असतानाच आता ही घटना समोर आली आहे. आता कर्नाटकातल्या एका महिलेने तिच्या पतीची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या केली आहे. तसंच हत्येनंतर तिच्या पतीचा मृतदेह घरापासून ३० किमी अंतरावर फेकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही गटना तिप्तूर तालुक्यातील कडाशेट्टीहळ्ळी गावात घडली आहे. शंकरमूर्ती असं हत्या झालेल्या माणसाचं नाव आहे. राजा रघुवंशीला त्याच्या पत्नीने म्हणजेच सोनमने इस्ट खासी हिल्स या ठिकाणी सुपारी किलर्सच्या मदतीने ठार केलं. या प्रकरणात पत्नीनेत पतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, त्याच्या मानेवर पाय ठेवला आणि मारहाण करत पतीची हत्या केली.

नेमकी काय घटना घडली?

शंकरमूर्ती हा त्याच्या शेतात असलेल्या घरात एकटा राहात होता. त्याची पत्नी सुमंगला ही तिपतूर या ठिकाणी असलेल्या एका वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून काम करत होती. त्या ठिकाणी तिची ओळख नागार्जुन नावाच्या एका माणसाशी झाली. या दोघांची मैत्री झाली आणि त्यांचे प्रेमसंबंधही जुळले. यानंतर सुमंगला आणि नागार्जुन या दोघांनीही शंकरमूर्तीची हत्या करण्याचा कट आखला. त्यानंतर २४ जूनच्या दिवशी सुमंगला आणि नागार्जुन दोघंही शंकरमूर्ती जिथे राहात होता तिथे गेले. सुमंगलाने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली, त्याच्या मानेवर पाय ठेवला आणि त्याला जबरदस्त मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शंकरमूर्तीचं प्रेत गोणीत भरलं आणि ३० किमी लांब असलेल्या विहिरीत फेकलं

सुमंगला आणि तिच्या प्रियकराने शंकरमूर्तीची हत्या केल्यानंतर त्याचं प्रेत गोणीत भरलं आणि ती गोणी त्या घरापासून ३० किमी अंतरावर एका विहिरीत फेकून दिली. सुरुवातीला शंकरमूर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा या घटनेचा कसून तपास केला तेव्हा त्याच्या अंथरुणात मिरची पावडरचे काही कण सापडले. तसंच त्याच्या अंथरुणाला अनेक सुरकुत्या पडल्या होत्या ज्यावरुन त्याने वाचण्यासाठी बहुदा बरीच तडफड केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शंकरमूर्तीची हत्या झाली आहे असं समजून पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी सुमंगला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरु केली. तसंच तिचे कॉल रेकॉर्डही तपासले. ज्यानंतर तिने आपणच पतीची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.