केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना नागरिकता दुरुस्ती कायद्याची अधिसूनचा जाहीर करून सदर कायदा अमलात आणला आहे. सरकारच्या या निर्मयानंतर सीमा हैदरने आनंद व्यक्त केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने सीमा हैदरचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओत सीमा हैदर लाडू वाटताना आणि फटाके फोडताना दिसत आहे. मागच्या वर्षी पाकिस्तानमधून नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर या सीएएमुळे आपल्याला नागरिकता मिळेल, या आशेवर आहे. मात्र उबाठा गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सीएए कायद्यातील तरतुदींचा हवाला देऊन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सीमा हैदर काय म्हणाली?

मागच्या वर्षी सीमा हैदर आपल्या चार मुलांसह अवैधरित्या भारतात आली होती. तिने हिंदू धर्म स्वीकारले असल्याचे सांगितले आहे. ती सध्या ग्रेटर नोएडमधील सचिन मीणा या युवकाबरोबर राहत आहे. दोघांनी लग्न केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सीएए कायदा लागू केल्यामुळे आपल्याला आता भारतीय नागरिकत्व मिळण्यात मदत होईल, असे सीमा हैदरचे म्हणणे आहे. याबद्दल तिने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
PM narendra Modi about changing Constitution India Bloc Rahul Gandhi loksabha election 2024
“स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 

सीमा हैदरने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत म्हटले, “भारत सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला आहे. याबद्दल मी खूश आहे आणि सरकारचे आभार मानते. पंतप्रधान मोदी यांनी जे आश्वासन दिले होते, ते पाळले आहे. त्याबद्दल मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहिल. या कायद्यामुळे आता मला नागरिकत्व मिळविण्यातील अडचणी दूर होतील.”

सीमा हैदर कशासाठी आनंद साजरा करतेय

शिवसेना उबाठा गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून यावर टोला लगावला आहे. सीमा हैदर कोणत्या गोष्टीचा आनंद व्यक्त करते आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सीएए कायद्यानुसार पाकिस्तान आणि शेजारी देशांमधून ज्या अल्पसंख्याकांचा उल्लेख केला गेला आहे, त्यामध्ये सीमा हैदरच्या धर्माचा उल्लेख नाही. तसेच सीमा हैदर डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेली नाही. तसेच अमेरिकेतही मेरी मिलिबन सीएए बद्दल आनंद व्यक्त करत आहे. हे सर्व अजबच आहे.

मेरी मिलिबन काय म्हणाली?

अमेरिकेतील प्रसिद्ध गायक मेरी मिलिबन यांनी सीएए लागू झाल्यानंतर शांतीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे सांगितले आहे. एक्सवर पोस्ट टाकत मिलिबन म्हणाल्या की, एक ख्रिश्चन, महिला आणि धार्मिक स्वतंत्रतासाठी जागतिक स्तरावर काम करणारी कार्यकर्ती म्हणून मला मोदी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करावेसे वाटते. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशात जे बिगर मुस्लीम अल्पसंख्याक आहेत. जे पीडित आहेत, त्यांना भारतात नागरिकत्व मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.