तैवानबाबत हस्तक्षेप करणे ‘आगीशी खेळ’

जिनपिंग यांचा बायडेन यांना अप्रत्यक्ष इशारा  बीजिंग/वॉशिंग्टन :चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी ऑनलाइन चर्चा केली. या बैठकीत अमेरिका आणि चीनमधील जवळपास सर्व वादग्रस्त मुद्दय़ांवरही चर्चा करण्यात आली. या वेळी जिनपिंग यांनी तैवानबाबत हस्तक्षेप करणे ‘आगीशी खेळ असेल’ असा इशारा दिला.  Also Readओमायक्रॉन अफ्रिकेत सापडण्याआधीच ‘या’ देशात पोहोचला होता; नव्या अभ्यासातून […]

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी ऑनलाइन चर्चा केली.

जिनपिंग यांचा बायडेन यांना अप्रत्यक्ष इशारा 

बीजिंग/वॉशिंग्टन :चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी ऑनलाइन चर्चा केली. या बैठकीत अमेरिका आणि चीनमधील जवळपास सर्व वादग्रस्त मुद्दय़ांवरही चर्चा करण्यात आली. या वेळी जिनपिंग यांनी तैवानबाबत हस्तक्षेप करणे ‘आगीशी खेळ असेल’ असा इशारा दिला.  

चीन आपल्या सार्वभौमत्व आणि सुरक्षाविषयक हितांचे रक्षण नक्कीच करेल. तैवानबाबत जो कोणी आगीशी खेळेल तो जळून खाक होईल, अशा शब्दांत जिनपिंग यांनी खडसावले.

बायडेन यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच शिखर बैठक आहे. याआधी दोघांमध्ये दूरध्वनीद्वारे संवाद झाला होता. ही चर्चा दोन फेऱ्यांमध्ये झाली आणि तीन तासांहून अधिक काळ चालली.

जिनपिंग म्हणाले की, काही अमेरिकन चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैवानचा वापर करू इच्छितात. अशा कृती आगीशी खेळण्यासारख्या अत्यंत धोकादायक आहेत. जो आगीशी खेळतो तो जळून जातो. चीनचे संपूर्ण एकीकरण करणे ही चिनीच्या सर्व मुला-मुलींची इच्छा आहे. आमच्याकडे संयम आहे आणि आम्ही सर्व प्रामाणिकपणे आणि शांततामय मार्गानी त्यासाठी प्रयत्न करू. जिनपिंग आणि बायडेन यांनी द्विपक्षीय संबंधांवर, देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणे, आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर विस्तृत आणि सखोल चर्चा केली असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Xi jinping warned joe biden over taiwan issue zws

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या