साध्या भाषेत सांगायचे झाले, तर खेळाडूने मादक द्रव्य, उत्तेजक पदार्थांचे सेवन केले आहे का हे पाहण्यासाठी डोपिंग चाचणी केली जाते. क्रीडा क्षेत्रात स्टेरॉईड्‌स, स्टिम्युलंट्‌स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्‍स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे डोपिंग केले जाते. कोणत्याही स्पर्धेपूर्वी किंवा प्रशिक्षण शिबिरात डोपिंग टेस्ट घेतली जाते. ही चाचणी विश्व डोपिंग संस्था आणि राष्ट्रीय डोपिंग संस्था यांच्याकडून घेतली जाते.

कशी होते डोपिंग टेस्ट ?
कुठल्याही खेळाडूची डोप टेस्ट घेतली जाऊ शकते. खेळाडूचे रक्ताचे आणि लघवीचे नमुने (युरिन सॅम्पल) तपासासाठी घेतले जातात. ते खेळाडूंसमोरच सिलबंद केले जातात. ‘वाडा’-‘नाडा’तर्फे याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. खेळाडूचे नमुने ‘नाडा’च्या प्रयोगशाळेत नेले जातात. ‘ए’ चाचणीत दोषी आढळल्यास खेळाडूचे तात्पुरते निलंबन केले जाते. त्यानंतर खेळाडू ‘बी’ चाचणीसाठी अपील करू शकतो. यानंतर पुन्हा या नमुन्यांची तपासणी केली जाते. जर ‘बी’ चाचणीतही खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षेला सामोरे जावे लागते.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

कारवाई काय?
खेळाडूवर तात्पुरते निलंबन
खेळाडूला त्याचे म्हणणे सादर करण्यास परवानगी
स्पर्धेतून कायमचे बाद केले जाते.
दोन ते पाच वर्षे किंवा आजीवन बंदी
मिळालेली पदके काढून घेतली जातात

काय आहेत नियम ? –
– उत्तेजकांचे सेवन करून स्पर्धेत भाग घेण्यास खेळाडूंना मनाई आहे.
– खेळाडूंच्या शरीरात प्रतिबंधक औषधांच्या यादीत असणारा कुठलाही पदार्थ आढळल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाते.
-अँटी डोपिंग समितीच्या चाचणीस नकार देणे व अनुपस्थित राहणे, जबाबदार अधिकाऱ्याच्या सूचनांकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करणे हा नियमभंग ठरविला आहे.
– आजारी पडल्यास घेण्यात येणारी औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावीत. यासाठी अर्ज व योग्य ती कागदपत्रे सादर करायला हवीत. त्याबद्दल अधिकृत मान्यता मिळवलेली असावी.
– स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूने मादक द्रव्य घेतलेले नाही, याची चाचणी देणे खेळाडूवर बंधनकारक आहे.
– चाचणीच्या वेळेस अनुपस्थित असणाऱ्या खेळाडूने अनुपस्थितीचे कारण सादर करायला हवे