scorecardresearch

Car Tips: अपघातानंतर वाहनाला आग लागल्यास ‘या’ गोष्टींमुळे वाचतील तुमचे प्राण; जाणून घ्या प्रवास करताना काय काळजी घ्यावी

Car Tips: गाडीला आग लागल्यानंतर गाडीचे दरवाजे आणि काचा पूर्णपणे लॉक होतात. त्यामुळे बाहेर पडता येत नाही. त्यासाठी गाडीमध्ये काही गोष्टी ठेवणे तुमच्या उपयोगी येऊ शकते.

Car Tips: अपघातानंतर वाहनाला आग लागल्यास ‘या’ गोष्टींमुळे वाचतील तुमचे प्राण; जाणून घ्या प्रवास करताना काय काळजी घ्यावी
चालत्या गाडीला आग लागल्यानंतर 'या' वस्तू गाडीमध्ये असतील तर करू शकता बचाव.(Photo-indianexpress)

Car Tips: अपघात हा कोणालाही आणि कुठेही होऊ शकतो. अपघात सांगून होत नाहीत, पण तो टाळण्यासाठी उपाय कराता येवू शकतात. अशा अनेक वेळा माणूसच अशा अपघातांना आमंत्रण देत असतो. जर या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या तर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना संबंधित अपघातापासून वाचवू शकता. यासोबतच कारला आग लागल्यास काय करावे हे देखील जाणून घ्या. काही अपघातांवर मानवी नियंत्रण नसते, मात्र रस्त्यावरील अपघातांचे एक प्रमुख कारण निष्काळजीपणा मानला जातो. चालत्या कारमध्ये आग लागणे हे एखाद्या व्यक्तीच्या निष्काळजीपणाचे परिणाम देखील असू शकतो.

गाडीचा अपघात झाल्यानंतर अनेकवेळा गाडीला आग लागल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या असतील. यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो तर काही जण जखमी होतात. आग लागल्यानंतर गाडीचे दरवाजे आणि काचा पूर्णपणे लॉक होतात. त्यामुळे बाहेर पडता येत नाही. त्यासाठी गाडीमध्ये काही गोष्टी ठेवणे तुमच्या उपयोगी येऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत जेणेकरुन कारचा अपघात झाल्यास तुम्ही गाडीत अडकू नये.

(आणखी वाचा : Car Discounts Offers: संधी गमावू नका! होंडाच्या ‘ह्या’ कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट; होणार ‘इतकी’ बचत )

या’ गोष्टी नेहमी कारमध्ये ठेवा

अनेकदा स्वस्तात काम कारण्यासाठी गॅरेजमधून (Garage) काम करून घेतलं जातं, पण यात काही गडबड झाल्यास, गाडीमध्ये शॉर्ट सर्किट (Short Circuit) होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे थोडे जास्त पैसे गेल्यास हरकत नाही. परंतु गाडीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमधून सर्व्हिसिंग करून घेतल्यास सेवा चांगली मिळते आणि गाडी सुरक्षित असल्याची हमी देखील मिळते.

  • हातोडा

अपघाताच्या वेळी अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्ही गाडीत नेहमी हातोडा ठेवावा, जेणेकरून गेट लॉक असताना तुम्ही काचा फोडू शकता आणि शुद्ध हवा श्वास घेऊ शकता.

  • तीक्ष्ण कात्री किंवा चाकू

अपघातादरम्यान सेंट्रल लॉकिंग सिस्टीम काम करत नसताना सीटबेल्ट देखील उघडत नाहीत. यासाठी सीटबेल्ट कापण्यासाठी तुमच्याकडे चाकू किंवा कात्री असणे आवश्यक आहे.

  • अग्निशामक स्प्रे

कारमधील आग विझवण्यासाठी लहान अग्निशामक स्प्रे किंवा सिलेंडर सोबत ठेवा.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:43 IST

संबंधित बातम्या