Why Towels Have Decorative Border : सध्या बाजारात विविध प्रकारचे, वेगवेगळ्या रंगांचे टॉवेल उपलब्ध आहेत. अंघोळीपासून ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी हात पुसण्याकरिता आपण बहुधा सगळेच टॉवेलचा उपयोग करतो. पण, तुम्ही कधी टॉवेलवर असणारी बॉर्डर निरखून पाहिली आहे का? या बॉर्डर टॉवेलवर का असतात? ती फक्त डिझाईन आहे की त्यामागे कोणतं खास कारण आहे याबद्दल जाणून घेऊ…

सोशल मीडियावर अनेकदा छोट्या छोट्या विषयांवरून चर्चा, वादविवाद होतच असतात. तर आज सोशल मीडियावर घरात वापरल्या जाणाऱ्या टॉवेलबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. ही चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनीयर नेट मॅकग्रेडी यांनी एक्स (ट्विटर)वर प्रश्न विचारला की, टॉवेलच्या शेवटी असलेल्या बॉर्डरचा उद्देश काय? त्यामुळे टॉवेल आकुंचन पावतो आणि मग टॉवेल व्यवस्थित दुमडणे अशक्य होते, ज्यामुळे तुम्हाला दुसरा टॉवेल खरेदी करावा लागतो, असे त्यांनी फक्त मस्करीत लिहिलेय.

मॅकग्रेडी यांची ही पोस्ट लवकरच व्हायरल झाली आणि अनेकांनी त्यावर आपापली मते मांडण्यास सुरुवात केली. बॉर्डर म्हणजे टॉवेल जलद सुकविण्यासाठी “रेसिंग स्ट्राइप” होय. दुसरा युजर म्हणाला की, टॉवेलवरची ही बॉर्डर चेहरा आणि शरीराच्या वरचा भाग पुसण्यासाठी डिझाईन केलेली असते. या सगळ्या विनोदी कमेंट्समध्ये काही युजर्सनी टॉवेलला बॉर्डर का असते याचे खास स्पष्टीकरण दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, टॉवेलवर असणाऱ्या या बॉर्डरला ‘डॉबी बॉर्डर’, असे म्हणतात. एक सजावटीची, घट्ट विणलेली पट्टी, जी टॉवेलचे कापड टिकवून ठेवण्यासाठी, फाटण्यापासून रोखण्यासाठी आणि घडी होण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेली असते. एका टॉवेल विक्रेत्याने पुढे सांगितले की, डॉबी बॉर्डर म्हणून ओळखली जाणारी ही विणलेली पट्टी पाणी शोषून घेणे सुधारण्यास व टॉवेलला पॉलिश लूक देण्यासही मदत करते. टॉवेलला जाड बॉर्डर असण्याची ही कारणे तुम्हाला माहीत होती का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.