How to edit or delete scheduled emails: Gmail मध्ये ईमेल शेड्यूल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या ट्रिकचा वापर करुन ठराविक ईमेल आधी तयार करुन एका विशिष्ट वेळी पाठवणे शक्य होते. ऑफिसचे काम करताना शेड्यूलिंगचा वापर केल्याने फायदा होऊ शकतो. परंतु काही वेळेस शेड्यूल केलेल्या ईमेलमध्ये चुका असू शकतात. या चुका तशाच राहिल्या तर समोरच्या व्यक्तीला दोष असलेला ईमेल पोहचू शकतो. अशा वेळी शेड्यूल केलेले ईमेल एडिट किंवा डिलीट करण्याबाबतची माहिती असल्यामुळे शेवटच्या मिनिटाला होणाऱ्या चुका टाळल्या जाऊ शकतात. ईमेल शेड्यूल केल्यानंतर तो समोरच्या व्यक्तीकडे पोहचण्यापूर्वीच्या एकूण कालावधीमध्ये शेड्यूल केलेले ईमेल्स एडिट/ डिलीट करता येऊ शकतात.

Gmail मधील शेड्यूल केलेला ईमेल एडिट करण्यासाठीच्या स्टेप्स-

  • तुम्ही वापरत असलेल्या ब्राऊजरवरुन Gmail वर जावे.
  • डाव्या बाजूला इनबॉक्स टॅबच्या खाली Schedule टॅब पाहायला मिळेल.
  • शेड्यूल टॅबमधील जो ईमेल एडिट करायचा आहे, त्या ईमेलवर क्लिक करावे.
  • पुढे त्या ईमेलच्या डाव्या बाजूला Cancel असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तो ईमेल ड्राफमध्ये जाईल.
  • ड्राफ केलेला ईमेलच्या Send या ऑप्शनच्या शेजारी असलेल्या chevron वर टॅब करावे
  • असे केल्यानंतर शेड्यूल ऑप्शन समोर येईल. त्यावर गेल्यावर योग्य वेळ निवडून पुन्हा एकदा ईमेल एडिट करता येतो.

Android किंवा iOS डिव्हाईसवरुन शेड्यूल केलेला ईमेल एडिट करण्यासाठीच्या स्टेप्स-

  • Android किंवा iOS डिव्हाईसवर म्हणजेच स्मार्टफोनवर Gmail वर जावे.
  • सर्च बारजवळील hamburger या तीन रेषांवर क्लिक केल्यावर खालच्या बाजूला Schedule टॅब पाहायला मिळेल.
  • या टॅबमधील ज्या ईमेलमध्ये बदल करायचे आहेत, त्यावर टॅब करावे.
  • त्यानंतर ईमेलच्या डाव्या बाजूला असलेल्या Cancel या ऑप्शनमध्ये क्लिक करावे.
  • यामुळे तो मेल ड्राफमध्ये जाईल. ड्राफमधील Pencil icon वर जाऊन आवश्यक बदल करावेत.
  • पुढे Send ऑप्शनच्या शेजारी असलेल्या तीन डॉट्सवर टॅब करुन नवीन शेड्युल टाइम सेट करावा.

Gmail मधील शेड्यूल केलेला ईमेल डिलीट करण्यासाठीच्या स्टेप्स-

  • ब्राऊजरवरुन Gmail टॅब सुरु करावी. त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या Schedule या ऑप्शनवर क्लिक करावे.
  • जो ईमेल डिलीट करायचा आहे, तो ओपन करावा. ईमेलच्या डाव्या बाजूला Cancel असा ऑप्शन दिसेल.
  • त्या ऑप्शनवर क्लिक केल्याने ईमेल ड्राफमध्ये जाईल.
  • ड्राफमध्ये गेलेला तो ईमेल उघडावा आणि त्याच्या खालच्या बाजूला असलेल्या Delete या ऑप्शनवर क्लिक करावे.

Android किंवा iOS डिव्हाईसवरुन शेड्यूल केलेला ईमेल डिलीट करण्यासाठीच्या स्टेप्स-

  • स्मार्टफोनवर Gmail सुरु करावे. पुढे सर्च बारजवळील hamburger या तीन रेषांवर क्लिक करावे.
  • जो ईमेल डिलीट करायचा आहे, तो ईमेल उघडावा.
  • त्या ईमेलमध्ये Cancel असे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्याने तो ईमेल ड्राफमध्ये जाईल.
  • ड्राफमध्ये गेलेल्या ईमेलच्या वरच्या बाजूला Delete असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक केल्याने तो ईमेल डिलीट होईल.

How to recover your Gmail password Reset Your Emails Password Read Details
Gmail चा पासवर्ड विसरला का? या ट्रिकने लगेच पुन्हा मिळेल अ‍ॅक्सेस; आयफोन आणि एंड्रॉइड यूजर्स या स्टेप्स फॉलो करा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
rava besan ladoo recipe in marathi
अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘रवा बेसन लाडू’, रेसिपी लगेच लिहून घ्या
Maghi ganesh chaturthi 2025 wishes messages quotes sms whatsapp facebook status in marathi
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : यूपीएससी २०२५ – अर्ज कसा भरावा?
how to get account statement information through call
कॉलद्वारे अकाउंट स्टेटमेंटची माहिती कशी मिळवावी? जाणून घ्या ‘या’ पाच स्टेप्स
How to send WhatsApp messages without save a number know 5 easy methods
मोबाइल नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज कसा पाठवायचा? जाणून घ्या पाच सोप्या पद्धती…
Jio, Airtel and Vi Voice and SMS Plan
Voice and SMS Plan : जिओ, एअरटेल की व्हीआय? कोणता रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरेल बेस्ट; वाचा यादी
Story img Loader