scorecardresearch

भारतातील सर्वात लांब ट्रेन कोणत्या? २९५ डब्बे व ६ इंजिन.. प्रवासाचा मार्ग वाचून व्हाल थक्क

Indian Railway Longest Train: भारतीय प्रवाशांची संख्या पाहता सरकारने काही अधिक डब्याच्या ट्रेन सुद्धा सुरु केल्या आहेत.

Indian Railway Longest Train With 295 Carts And Six Power Engines How Many Stations It Covers Will Shock You
भारतातील सर्वात मोठ्या ट्रेन (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Indian Railway Longest Railway: आपण आजवर अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल. जगभरात ट्रेनचे विस्तृत जाळे आहे पण भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. स्वस्त तिकीट व सुखकर प्रवास यामुळे शक्यतो लोक विमानापेक्षाही ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतात. भारतीय प्रवाशांची संख्या पाहता सरकारने काही अधिक डब्याच्या ट्रेन सुद्धा सुरु केल्या आहेत. तुम्हाला माहित आहे का सध्या भारतात तीन अशा ट्रेन आहेत ज्यांच्या डब्याची संख्या दहा-वीस नव्हे तर चक्क शे- दोनशेच्या घरात आहे. या गाडयांना प्रवासासाठी चार ते सहा इंजिन आवश्यक असतात. अशा या ट्रेन कोणत्या व त्यांच्या प्रवासाचा मार्ग कुठला हे आपण जाणून घेऊया…

भारतातील सर्वात मोठ्या ट्रेन (Longest Train In India)

१) शेषनाग ट्रेन

शेषनाग ट्रेन ही भारतातील सर्वात लांब व मोठ्या रेल्वेपैकी एक आहे. या ट्रेनची लांबी किमान २.८ किलोमीटर आहे. या ट्रेनच्या प्रवासासाठु तब्बल ४ इंजिनांची गरज लागते. ही प्रवासी गाडी नसून एक माल वाहून नेणारी गाडी आहे.

२) सुपर वासुकी

भारतातील सर्वात लांबलचक ट्रेन म्हणजे सुपर वासुकी. या ट्रेनची सुरुवात भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनी झाली होती. या ट्रेनसाठी तब्बल ६ इंजिनांची गरज असते या ट्रेनला २० किंवा ३० नव्हे तर चक्क २९५ डब्बे आहेत. या ट्रेनची लांबी तब्बल ३.५ किलोमीटर आहे/

३) विवेक एक्सप्रेस

विवेक एक्प्रेस हे केवळ सर्वात लांब डब्ब्यांची नव्हे तर सर्वात लांब प्रवास करणारी सुद्धा ट्रेन आहे. ही ट्रेन डिब्रूगढ़ पासून प्रवास सुरु करते व कन्याकुमारी पर्यंत जाते. ही ट्रेन तिरुवंतपुरम, कोयंबतुर, विजयवाडा, विशाखापट्टनम व भुवनेश्वर अशा अनेक ठिकाणांहून ही ट्रेन जाते. सद्य घडीला या ट्रेनचे २३ डब्बे आहेत व तब्बल ४,२३४ किमीचा प्रवास ही एकटी ट्रेन करते.

हे ही वाचा<< मध्य रेल्वे स्थानकात एस्केल्टर सतत का बंद पडतात? अधिकाऱ्यांनी दाखवल्या कुली व प्रवाशांच्या ‘या’ चुका

तुम्हाला या ट्रेनविषयी माहिती होती का? ही नव्याने समोर आलेली माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करून त्यांच्याही सामान्य ज्ञानात भर टाकायला विसरु नका.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 14:35 IST