Longest Highway: राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील भारतातील पाहिला अंडरपास बनवण्यात आला आहे. हा मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये आहे, जिथून प्राणी बाहेर पडतात. आणि पुलाच्या वरून वाहने जातात. याची लांबी ७५० मीटर आहे, जो जगातील प्राण्यांसाठी बनवलेला सर्वात मोठा अंडरपास आहे.

सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग

देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय मार्ग कोणता हे तुम्हाला माहीत आहे का? राष्ट्रीय महामार्ग ४४ हा देशातील ११ राज्यांमधून जातो. यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

( हे ही वाचा: भारतात ‘या’ ठिकाणी आहे जगातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली नोंद)

काश्मीर ते कन्याकुमारी..

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ ची लांबी सुमारे ३७४५ किलोमीटर आहे. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून सुरू होणारा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ तमिळनाडूमधील कन्याकुमारीला जोडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

NH-44 वर कोणती शहरे आहेत

श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, लुधियाना, अंबाला, कर्नाल, दिल्ली, आग्रा, ग्वाल्हेर, झाशी, नागपूर, हैदराबाद, बंगलोर, धर्मपुरी, सालेम, करूर, मदुराई, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी ही शहरे राष्ट्रीय महामार्ग-44 वर आहेत.