भारतातील सर्वात लांब रेल्वेस्थानक कोणते असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. आज आम्ही तुम्हाला याबाबतची माहिती सांगणार आहोत. गोरखपूर जंक्शन हे भारतातील सर्वात लांब रेल्वेस्थानक आहे. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये गोरखपूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मचे नाव सर्वात आधी येते. हे भारतातील उत्तर प्रदेश येथे आहे. गोरखपूर शहर राप्ती नदीच्या काठावर वसलेले आहे. हे शहर नेपाळ सीमेच्या अगदी जवळ आहे.

गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद

गोरखपूर हे उत्तर प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे. गोरखपूर शहर हे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे. जे क्लास A1 स्थानकाची सुविधा पुरवते. ६ ऑक्टोबर २०१३ पासून ते जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म बनले. याचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये पहिल्या स्थानावर नोंदवले गेले आहे. त्याची प्लॅटफॉर्म लांबी १३६६.३३ मीटर रॅम्पसह १३५५.४० मीटर रॅम्पला सोडून आहे. याने पश्चिम बंगालमधील खरगपूर रेल्वे स्टेशनचा विक्रम मोडला ज्याची लांबी १०७२ मीटर होती. याचा रिकॉर्ड मोडून या स्टेशनने नवीन रिकॉर्ड बनवला.

एवढा लांबलचक प्लॅटफॉर्म का बनवला गेला?

चला तर मग जाणून घेऊया की कोणतीही ट्रेन इतकी लांब नसताना हा प्लॅटफॉर्म इतका लांब का आहे. एवढा लांबलचक प्लॅटफॉर्म का बनवला गेला? जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म बनवला जातो तेव्हा तो तिथे असलेल्या जागेवर उपलब्ध असतो. जर तुम्ही गुगलमध्ये पाहीले तर तुम्हाला कळेल की, या स्टेशनच्या बाजूला एक मुख्य प्रवेशद्वार आहे, तिथे एक मुख्य रस्ता आहे. आणि त्याच्या पलीकडे एक प्रचंड रेल्वे वर्कशॉप आहे. अशावेळी येथे अधिक रुंदीचा प्लॅटफॉर्म करणे शक्य नाही.

( हे ही वाचा: भारतातील ‘हे’ ३ रेल्वे मार्ग थेट परदेशात जातात; पहिल्या रेल्वेमार्गाचे नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोरखपूरला मुख्यालय असल्याने येथे गाड्यांची वारंवारता जास्त होती. यामुळे याला इतका लांब बनवला गेला की, या प्लेटफॉर्मवर एकाचवेळी २ ते ३ गाड्या एकत्र थांबवता येईल. एकाच लाईनवर ३ प्लॅटफॉर्म आहेत. १ नंबर प्लॅटफॉर्म जिथे संपतो तिथून २ नंबर प्लॅटफॉर्म सुरू होतो. आणि याच्या काही अंतरावर ३ नंबर प्लॅटफॉर्म सुरू होतो.