गेल्या काही वर्षांमध्ये भारतात करोडपती कुटुंबांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळतेय. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी करोडपतींच्या श्रेणीत येणाऱ्या लोकांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, मुंबईत सर्वाधिक २०,३०० डॉलर करोडपती आहेत.

यानंतर १७,४०० करोडपती कुटुंबे दिल्लीत तर १०,५०० कुटुंब कोलकत्यात राहतात. जर तुम्ही देखील या तीन शहरात फिरायला जाण्याचा विचार करत असाल. तर आम्ही तुम्हाला त्या शहरातील करोडपतींच्या आलिशान घरांबद्दल सांगू, ज्यांची गणना भारतातील सर्वात महागड्या घरांमध्ये केली जाते.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Maharashtra maintains monopoly in sugar production
साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम; सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
IPL 2024 The List of Mumbai and Maharashtra Players which team has the most
IPL 2024: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई-महाराष्ट्राचा टक्का सर्वाधिक, पाहा कोणत्या संघात आहेत सर्वाधिक खेळाडू

अँटिलिया, मुंबई (Antilia, Mumbai)

अँटिलिया ही भारतातील सर्वात महाग प्रॉपर्टी आहे. ज्यामध्ये २७ मजल्यांचा समावेश आहे. याठिकाणी अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत ज्यांचा तुम्ही विचारही करू शकत नाही. यात एक सलून, एक चित्रपटगृह, एक आईस्क्रीम पार्लर, एक स्विमिंग पूल, बहुमजली कार पार्किंग, ३ हेलिपॅड, इतर अनेक आलिशान सुविधा आहेत. रिपोर्ट्सनुसार, या प्रॉपर्टीची किंमत ६००० ते १२००० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. मुंबईला फिरायला जाताना अंबानी कुटुंबाच्या या घराला भेट द्यायला विसरू नका.

मन्नत, मुंबई (Mannat, Mumbai)

मुंबईत शाहरुख खानच्या बंगल्याची प्रचंड चर्चा आहे. त्याच्या बंगल्याबाहेर नेहमी गर्दी पाहायला मिळते. मन्नत ही एक भव्य प्रॉपर्टी आहे. अरबी समुद्रासमोर बांधलेला हा मोठा बंगला मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड येथे आहे. अहवालानुसार, या ६ मजली उंच इमारतीची किंमत सुमारे २०० कोटी रुपये आहे आणि त्यात अनेक बेडरूम, एक जिम, लायब्ररी आणि अनेक लक्झरी वस्तूंचा समावेश आहे.

जिंदल हाऊस, दिल्ली (Jindal House, Delhi)

नवीन जिंदल यांचे घर लुटियन्स बंगला परिसरात असून ते ३ एकरात पसरलेले आहे. ही आकर्षक इमारत नवी दिल्लीतील सर्वात महागड्या आलिशान घरांपैकी एक आहे. वृत्तानुसार, या मालमत्तेची किंमत १२० ते १५० कोटी रुपये आहे.

रुईया हाऊस, दिल्ली (Ruia House, Delhi)

रवी रुईया आणि शशी रुईया यांचे हे घर दिल्लीत आहे. हा भव्य बंगला एस्सार ग्रुपचे मालक आणि बिझनेस टाइकून रुईया बंधूंचा आहे. हा सुंदर बंगला २.२४ एकरमध्ये पसरलेला आहे आणि अहवालानुसार त्याची किंमत १२० कोटी रुपये आहे.

( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त ८०० लोकं)

अबोड, मुंबई (Abode, Mumbai)

हे मुंबईतील आणखी एक सुंदर घर आहे. जे १६००० स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरले आहे. अनिल अंबानींचे हे घर सुमारे ७० मीटर उंच आहे. मुंबईच्या पाली हिल येथे असलेल्या या मालमत्तेत स्विमिंग पूल, स्पा, जिमचा समावेश आहे. हे घर ७ स्टार हॉटेलसारखे दिसते. वृत्तानुसार, या मालमत्तेचे मूल्य ५००० कोटी रुपये आहे.

रतन टाटा यांचे रिटायरमेंट घर (Ratan Tata ‘s Retirement home)

टाटा समूहाचे मालक रतन टाटा यांचे घरही अतिशय आलिशान आहे. मुंबईतील कुलाबा येथे असलेल्या या घराची किंमत सुमारे १५० कोटी रुपये आहे. १३,३५० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे घर ७ भागांमध्ये विभागले गेले आहे. या आलिशान मालमत्तेत जिम, मीडिया रूम, सन डेक, खाजगी पार्किंग आणि पूल देखील आहे.