Indian Railway Viral Video: भारतातील सर्वात लांब पूल आसाममधील दिब्रुगड येथे ब्रह्मपुत्रा नदीवर बांधला गेला आहे. बोगीबील पूल हा देशातील सर्वात लांब पूल आहे. हा पूल ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील किनारी धेमाजी आणि दिब्रुगड यांना जोडण्याचे काम करतो. तब्ब्ल ४.९ किमी लांबीचा आशियातील सर्वाधिक लांबीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या या पुलाची आणखी एक विशेष माहिती भारतीय रेल्वेने शेअर केली आहे. तुम्हाला माहित आहे का की हा पूल रेल्वे-रोड पूल अशा नावाने सुद्धा ओळखला जातो. याचा अर्थ म्हणजे या पुलावरून रेल्वे व गाड्या दोन्ही जाऊ शकतात. भारतीय रेल्वेने ही थक्क करणारी माहिती देताना त्यासह एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.

भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार, हा पूल लोखंडी आहे, रेल्वेने बांधलेल्या या डबल डेकर पुलावर वरच्या भागात तीन पदरी रस्ता आहे. आणि खाली दोन रेल्वे ट्रॅक बनवण्यात आले आहेत. बोगीबीलमधील ब्रह्मपुत्रा नदीची रुंदी १०.३ किमी आहे, परंतु येथे रेल्वे पूल बनवण्यासाठी प्रथम तंत्रज्ञानाचा वापर करून नदीची रुंदी कमी करण्यात आली आणि नंतर त्यावर ५ किमी लांबीचा रेल्वे-रस्ता पूल बांधण्यात आला. यासाठी रेल्वेने पहिल्यांदाच स्टील गर्डरचा वापर करून एवढा मोठा पूल बनवला आहे. हा पूल इतका मजबूत बनवण्यात आला आहे की, यावरून लष्करी रणगाडेही जाऊ शकतात.

Video: भारतीय रेल्वेचा अनोखा पूल

हे ही वाचा<< भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य काय? सर्वात मोठा रेल्वे मार्ग कोणता? मुंबई लोकल जेव्हा ठाण्यात… ‘या’ १० प्रश्नांची उत्तरे माहितच हवीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राप्त माहितीनुसार, तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी २२ जानेवारी १९९७ रोजी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. यानंतर या प्रकल्पाचे काम तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २१ एप्रिल २००२ ला सुरू केले होते आणि २०१८ मध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती