घरात आपण अनेक वर्षांपासून केशरी, लाल, पांढरा आणि तर रंगीबेरंगी साबण वापरतो. यात अंघोळीसाठी, टॉयलेटवरून आल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी आपण वेगवेगळे साबण वापरतो. पण तुम्हाला माहित आहे का साबणामध्येही वेगवेगळे प्रकार असतात. काही साबण हे टॉयलेट सोप असतात आणि काही बाथिंग सोप (अंघोळीचा साबण) असतात. बऱ्याच लोकांना साबणातील हाच फरक माहित नसतो आणि ते टॉयलेट सोप अंघोळ करण्यासाठी, चेहरा धुण्यासाठी वापरतात. त्यामुळे टॉयलेट सोप आणि बाथिंग सोपमध्ये काय फरक आहे समजून घेऊ या.

अनेक अहवालानुसार, भारतातील निम्म्याहून अधिक साबण हे टॉयलेट सोप श्रेणीत येतात. होय, अनेकांना याची फारशी माहिती नसते, त्यामुळे वर्षानुवर्षे काहीजण टॉयलेट सोप अंघोळीसाठी वापरतात.

कोणता साबण बाथिंग सोप आहे आणि कोणता टॉयलेट सोप हे त्यातील घटकांनुसार ओळखता येतो, बहुतेक लाल आणि केशरी रंगाचे साबण हे टॉयलेट सोप श्रेणीत येतात. प्रत्येक साबणात TFM वॅल्यू असते, ज्याला टोटल फॅटी मॅटर असे म्हणतात. या आधारावर साबणींची तीन श्रेणीत विभागणी होते. ग्रेड १ साबणामध्ये ७६ पेक्षा जास्त TFM असते, ग्रेड २ मध्ये ७० पेक्षा जास्त आणि ग्रेड ३ मध्ये ६० पेक्षा जास्त TFM असते.

ग्रेडिंगनुसार, जर ग्रेड १ चे साबण सोडले तर बाकी सर्व ग्रेडचे साबण टॉयलेट सोपच्या कॅटगरीमध्ये येतात. जे काही साबण ग्रेड १ च्या श्रेणीत येतात, ते बाथिंग सोप कॅटगरीमध्ये येतात.

Birds of death : सुंदर दिसणाऱ्या ‘या’ पक्ष्यांचा पंखात असते घातक विष; ३० सेकंदात होऊ शकतो मृत्यू

ग्रेड १ च्या साबणात TFM चे प्रमाण अधिक का असते?

ग्रेड १ साबणांमध्ये अधिक TFM असते ज्यामुळे शरीर मऊ होते. अनेक पांढऱ्या आणि थोड्या महागड्या साबणांमध्ये तुम्हाला हा फरक जाणवला असेल. मॉइश्चरायझिंगसाठी या साबणांमध्ये अनेक प्रकारचे घटक देखील आढळतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाथिंग सोप आणि टॉयलेट सोपमधील फरक कसा ओळखाल?

बाथिंग सोप आणि टॉयलेट सोपमधील फरक ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यातील TMF आणि इतर घटक वाचणे. तसेच साबणाच्या रॅपरवरही स्पष्टपणे लिहिलेले असते की, तुम्ही वापरत असलेला साबण टॉयलेट सोप आहे की बाथिंग सोप.